TRENDING:

या स्किममधून महिलांना मिळतात जबरदस्त रिटर्न! पण गुंतवणुकीची संधी मार्च पर्यंतच

Last Updated:

सरकारतर्फे अशा अनेक योजना राबवल्या जातात. ज्यामध्ये महिलांना चांगले रिटर्न मिळते. आज आपण अशाच एका योजनेविषयी जाणून घेऊया. ज्यात महिलांना चांगले व्याज दिले जाते. मात्र यामध्ये गुंतवणूक करण्याची संधी 31 मार्च 2025 पर्यंतच आहे.

advertisement
मुंबई : महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सरकार अनेक योजना राबवते. त्यापैकी एक योजना म्हणजे महिला सन्मान बचत प्रमाणपत्र. ही एक डिपॉझिट स्किम आहे. ज्यामध्ये महिला दोन वर्षांसाठी त्यांचे पैसे गुंतवू शकतात आणि चांगल्या व्याजदराचा लाभ घेऊ शकतात. सध्या या योजनेत 7.5 टक्के दराने व्याज दिले जात आहे. तुम्हालाही या योजनेत गुंतवणूक करायची असेल तर हे काम त्वरित पूर्ण करा. तुम्हाला फक्त 31 मार्च 2025 पर्यंत गुंतवणूक करण्याची संधी आहे.
महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट
महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट
advertisement

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेचे फायदे

-महिला सन्मान बचत पत्र योजना ही फिक्स्ड डिपॉझिट योजनेसारखी आहे. ही वन टाइम डिपॉझिट स्किम आहे. यामध्ये तुमचे पैसे सुरक्षित राहतील आणि तुम्हाला त्यावर हमखास रिटर्न मिळेल.

-महिला सन्मान बचत पत्र योजनेच्या व्याजाची तुलना इतर अल्प बचत योजनांशी केली तर दोन वर्षांच्या कालावधीत ती अजूनही अनेक योजनांपेक्षा चांगली दिसते.

advertisement

-या योजनेत ते दोन वर्षांनीच मॅच्योर होते. तुमचे पैसे जास्त काळ त्यात अडकणार नाहीत. आवश्यक असल्यास, आपण आंशिक पैसे काढू शकता.

-वयाचे कोणतेही बंधन नाही, ही योजना कोणत्याही वयोगटातील मुलगी किंवा महिलेच्या नावावर गुंतविली जाऊ शकते.

5 लाखांचे 15 लाख करण्याची सुवर्णसंधी! ही आहे पोस्ट ऑफिसची भारी स्किम – News18 मराठी

advertisement

2 लाखांच्या गुंतवणुकीवर तुम्हाला किती पैसे मिळतील

महिला या योजनेत 1,000 रुपये ते कमाल 2,00,000 रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतात. ही रक्कम दोन वर्षांसाठी जमा केली जाते. त्यानंतर मॅच्युरिटी झाल्यावर व्याजासह रक्कम महिलांना परत केली जाते. MSSC कॅल्क्युलेटरनुसार, जर एखाद्या महिलेने या योजनेत 2,00,000 रुपये जमा केले तर तिला 7.5% दराने व्याज म्हणून 32,044 रुपये मिळतील. अशा परिस्थितीत, दोन वर्षानंतरची मॅच्युरिटी रक्कम 2,32,044 रुपये असेल.

advertisement

तर 1,50,000 रुपये गुंतवल्यास, तुम्हाला दोन वर्षांनी 1,74,033 रुपये मिळतील. या प्रकरणात, 24,033 रुपये फक्त व्याज म्हणून मिळतील. तुम्ही 1,00,000 रुपये गुंतवले तर 7.5 टक्के व्याजदराने, तुम्हाला मॅच्युरिटीच्या वेळी 1,16,022 रुपये मिळतील आणि जर तुम्ही 50,000 रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला दोन वर्षात 8011 रुपये व्याज म्हणून मिळतील आणि अशा प्रकारे एकूण रक्कम मॅच्योरिटी 58,011 रुपये असेल.

advertisement

Mutual Fund SIP मध्ये गुंतवणूक करताय? या 11 गोष्टी ठेवा लक्षात, मिळेल चांगलं रिटर्न – News18 मराठी

एक वर्षानंतर आंशिक पैसे काढण्याची सुविधा

नियमांनुसार, महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना 2 वर्षात परिपक्व होते. परंतु तुम्हाला 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आंशिक पैसे काढण्याची सुविधा मिळते. आवश्यक असल्यास, तुम्ही एका वर्षानंतर 40 टक्के रक्कम काढू शकता. समजा तुम्ही या योजनेत 2 लाख रुपये जमा केले असतील तर एक वर्षानंतर तुम्ही 80 हजार रुपये काढू शकता.

असे उघडा अकाउंट

तुम्हालाही महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेत गुंतवणूक करायची असेल, तर तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये अकाउंट उघडू शकता. अल्पवयीन मुलीच्या नावाने पालक अकाउंट उघडू शकतात. अकाउंट उघडताना, तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड आणि रंगीत फोटो इत्यादी केवायसी कागदपत्रांची आवश्यकता असेल.

मराठी बातम्या/मनी/
या स्किममधून महिलांना मिळतात जबरदस्त रिटर्न! पण गुंतवणुकीची संधी मार्च पर्यंतच
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल