TRENDING:

Women Success Story: बाईपण भारीच! बचत गटाच्या पुरणपोळीची अमेरिकेत वारी, महिन्याला डाॅलरमध्ये कमाई

Last Updated:

गोदावरी महिला बचत गटाच्या माध्यमातून बनवली जाणारी आवळा खवा पुरणपोळी ही अतिशय फेमस आहे. आवळ्याचा मुरंबा वापरून सुद्धा ही आवळा पुरणपोळी वर्षभर बनवता येते, असं बचत गटातील महिला सांगतात.

advertisement
अमरावती : अमरावती जिल्ह्यातील तळेगाव ठाकूर येथील गोदावरी बचत गटाच्या माध्यमातून पापड, लोणचे आणि आवळा खवा पुरणपोळीचा व्यवसाय गेले 16 वर्षांपासून सुरू आहे. 2007 पासून अगदी छोट्याशा खोलीत सुरू केलेला व्यवसाय आज दूरपर्यंत जावून पोहचला आहे. या बचत गटाच्या माध्यमातून बनवली जाणारी आवळा खवा पुरणपोळी ही अतिशय फेमस आहे. आवळ्याचा मुरंबा वापरून सुद्धा ही आवळा पुरणपोळी वर्षभर बनवता येते, असं बचत गटातील महिला सांगतात.
advertisement

गोदावरी महिला बचत गटाच्या सदस्या सुनीता चौधरी यांच्याशी लोकल 18 ने संवाद साधला. तेव्हा त्या सांगतात की, 2003 पासून आमचा हा गोदावरी महिला बचत गट आहे. 2007 पासून आम्ही व्यवसायाला सुरवात केली. बचत गटाच्या अध्यक्षा कल्पना दिवे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा बचत गट चालवत आहे. सुरवातीला दुसऱ्याच्या शेतातील माल विकत घेऊन आम्ही हा व्यवसाय चालवत होतो. त्यानंतर काही दिवसांनी दिवे मॅडम यांनी त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या शेतात विविध फळांची लागवड केली. त्यात आवळा, कैरी आणि इतर काही आमच्या उपयोगाचे फळ आहेत. त्याच फळातून आमचा हा व्यवसाय सुरू आहे. आम्ही सध्या 11 प्रकारचे लोणचे, पापड, मुरंबा आणि आवळा खवा पुरणपोळी बनवत आहे.

advertisement

Health tips: पॅकेटमधलं दूध कसं प्यावं? उकळून पिणे योग्य की अयोग्य? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला

आवळा खवा पुरणपोळीची कल्पना कशी सुचली

काही वर्षांनंतर शेतात आवळा खूप पिकत होता. त्यातून आम्ही आवळा कॅंडी, सरबत, मुरंबा हेच पदार्थ बनवत होतो. मग विचार केला की, आपण जर बनवलेल्या मुराब्यापासून पुरणपोळी तयार केली तर? त्याच काही दिवसानंतर हा प्रयोग करून बघितला आणि तो यशस्वी झाला.

advertisement

आवळा खवा पुरणपोळीची रेसिपी काय

आवळा सर्वात आधी शिजवून त्याच छान बारीक सारण करून घ्यायचं. नंतर त्यात गूळ किंवा साखर घालून त्याला पाक आणायचा. त्यांनतर खोबराकिस, शेंगदाणे कूट, वेलची टाकून त्याच छान पुरण तयार होते. त्यानंतर आपण जशी आपली साधी पुरणपोळी बनवतो तशीच ही सुद्धा बनवून घ्यायची. याला जेवढं सरण तेवढी लाटी घ्यावी लागते. त्यानंतर चविष्ट आणि आरोग्यवर्धक पुरणपोळी तयार होते, असे कल्पना सांगतात.

advertisement

अमेरिकेत सुद्धा पोहचली गोदावरीची पुरणपोळी 

2007 मध्ये आवळा खवा पुरणपोळी बनवायला सुरवात केल्यानंतर आम्ही विविध ठिकाणी स्टॉल लावण्यास सुरुवात केली. प्रदर्शनी, महोत्सव आणि बऱ्याच अशा इव्हेंटमध्ये आम्ही पुरणपोळी विकल्या जात होती. एकदा दिल्लीला गेलेलो असताना त्याठिकाणी गॅस पेटवण्यासाठी बंदी होती. चूल पेटवली तर ते विझवून देत होते. तरीही एक पुरणपोळी तयार करून मी तेथील इंचार्जला खाण्यासाठी दिली. त्यानंतर आम्हाला पुरणपोळी बनवण्याची परवानगी मिळाली. त्यानंतर 3 दिवसांत त्याठिकाणी आम्ही 40 हजार रुपयांची पुरणपोळी विकली होती, असे कल्पना सांगतात. त्यांनतर काही दिवसांनी अमेरिकेतील काही लोकांनी सुद्धा आमच्या स्टॉलला भेट दिली.

advertisement

त्यांना ही पुरणपोळी इतकी आवडली की त्यांनी आम्हाला अमेरिकेत येऊन ही आवळा खवा पुरणपोळी बनवण्याची संधी दिली. अशा अनेक लोकांकडून आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला. दिल्ली, मुंबई, कोलकत्ता आणि इतरही अनेक शहरांत आमची पुरणपोळी पोहचली आहेत्यातून आमचा हा व्यवसाय सुरळीत चालू आहे. याच व्यवसायाच्या माध्यमातून अनेक महिलांना रोजगार मिळाला आहे. महिन्याला या व्यवसायाच्या माध्यमातून आम्ही 1 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न घेत आहोत, असे कल्पना सांगतात

मराठी बातम्या/मनी/
Women Success Story: बाईपण भारीच! बचत गटाच्या पुरणपोळीची अमेरिकेत वारी, महिन्याला डाॅलरमध्ये कमाई
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल