Health tips: पॅकेटमधलं दूध कसं प्यावं? उकळून पिणे योग्य की अयोग्य? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
- Published by:Mohan Najan
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
दूध पिणे हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. दुधामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि इतर पोषक घटक असतात जे आपले आरोग्य चांगले ठेवायला मदत करतात.
छत्रपती संभाजीनगर: दूध पिणे हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. दुधामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि इतर पोषक घटक असतात जे आपले आरोग्य चांगले ठेवायला मदत करतात. पण काही वेळा आपण पॅकेटमधलं दूध उकळून घेतो. पण हे जे पॅकेटमधलं दूध आहे ते आपण खरच उकळून घ्यायला हवं की नको? याविषयीच माहिती आहार तज्ज्ञ मंजू मठाळकर यांनी दिली आहे.
योग्य प्रकारे पाश्चरायझेशन केलेले दूध हे पॅकेटमध्ये भरले जाते. पाश्चरायझेशन ही जी प्रक्रिया आहे ही दोन प्रकारे केली जाते. एक म्हणजे की एकदम उच्च तापमानावरती (हाय टेम्परेचरवरती) दुधाला एक ते दोन सेकंद गरम केले जाते आणि त्यानंतर ते पॅकेटमध्ये भरले जाते. आणि दुसरी प्रक्रिया म्हणजे की 15 ते 30 सेकंदांसाठी दुधाला एकदम उच्च तापमानावरती (हाय टेम्परेचरवरती) उकळवले जाते आणि नंतर ते पॅकेटमध्ये भरले जाते. ही प्रक्रिया यासाठी केली जाते की आपण आजकाल बघतो की शहरापर्यंत येईपर्यंत दूध हे नाशवंत होऊन जातो आणि त्यामुळे ते वापरण्यायोग्य राहत नाही. ही प्रक्रिया केल्यानंतर हे दूध काही दिवसांसाठी आपण वापरू शकतो, असं मंजू मठाळकर सांगतात.
advertisement
पाश्चरायझेशन केल्यामुळे सर्व जंतू आणि जे अनावश्यक घटक असतात दुधामध्ये ते यामुळे नष्ट होतात आणि हे दूध चांगले राहायला मदत होते. तसेच हे जे दूध आहे पॅकेटमध्ये हे आपण न उकळता आज रूम टेम्परेचरवरती थंड करून तसेच पिलं तरीसुद्धा चालते. कारण की ते अगोदरच उकळून आलेले असते.
advertisement
पण जर तुम्हाला दुधापासून विविध पदार्थ करायचे असतील तर तुम्ही दूध हे उकळून घेऊ शकता. पण जर तुम्हाला नुसतेच दूध घ्यायचे असेल तर तुम्ही ते रूम टेम्परेचरला थंड करून तसेच घ्यावे, असं मंजू मठाळकर सांगतात.
त्यामुळे पॅकेटमधलं दूध हे तुम्ही न उकळता घेतले तरीसुद्धा चालते. त्यामुळे कुठलाही असा वाईट परिणाम हा तुमच्यावरती होत नाही, असंही मंजू मठाळकर यांनी सांगितलं.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
May 31, 2025 12:31 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Health tips: पॅकेटमधलं दूध कसं प्यावं? उकळून पिणे योग्य की अयोग्य? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला