Sanjay Raut On Cancer: "पाणी पिणंही कठीण झालं होतं..."; संजय राऊतांचा मृत्यूशी झुंज देणारा तो थरार, पहिल्यांदाच केला खुलासा!
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
Sanjay Raut:शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मागील वर्षी गंभीर आजाराने ग्रासले होते. त्यानंतर आता संजय राऊत यांनी आपल्या आजाराबाबत सविस्तर भाष्य केले आहे.
मुंबई: शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मागील वर्षी गंभीर आजाराने ग्रासले होते. त्यानंतर आता संजय राऊत यांनी आपल्या आजाराबाबत सविस्तर भाष्य केले आहे. संजय राऊत यांनी एका निवेदनाद्वारे आपण काही महिने सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थित राहणार नसल्याचे म्हटले होते. उपचारानंतर संजय राऊत पुन्हा राजकारणात सक्रिय झाले. दिवाळीच्या काही दिवस आधीच आपल्याला कॅन्सर झाल्याचे राऊत यांनी एका मुलाखतीत सांगितले.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत संजय राऊत यांनी "मला पोटात कर्करोग (कॅन्सर) झाल्याचे निदान झाले होते, असं सांगत त्या दिवसातील अंगावर काटा आणणारे प्रसंग सांगितले.
ऐन दिवाळीत कर्करोगाचे निदान
संजय राऊत यांनी सांगितले की, दिवाळीच्या अवघ्या दोन-चार दिवस आधी त्यांना या गंभीर आजाराविषयी समजले. सुरुवातीला सततचे दौरे, धावपळ आणि अपुऱ्या झोपेमुळे त्रास होत असावा, असे त्यांना वाटले होते. मात्र, त्यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांनी संशयावरून रक्ताची तपासणी करण्याचा आग्रह धरला आणि त्या रिपोर्टमध्ये 'पोटात कॅन्सर' असल्याचे निदान झाले.
advertisement
"आजारापेक्षा उपचार भयंकर", दीड महिना मृत्यूशी झुंज
कर्करोगासारख्या जीवघेण्या आजाराचे नाव ऐकल्यावर अनेकजण खचून जातात, मात्र राऊत यांनी हे निदान हसण्यावारी नेले होते. "निदान झाल्यावर मी हसलो, पण कुटुंबाने मला तातडीने रुग्णालयात दाखल केले. ऐन दिवाळीत माझ्यावर रेडिएशन आणि किमोथेरपी सुरू करण्यात आली," असे राऊत यांनी सांगितले.
उपचारांच्या यातनांविषयी बोलताना संजय राऊत यांनी म्हटले की, "दीड महिना मी अक्षरशः बंदिस्त होतो. कधी रुग्णालय तर कधी घर, अशा फेऱ्या सुरू होत्या. हा काळ अत्यंत यातनादायी होता. आजारापेक्षा त्यावरचे उपचार अधिक भयंकर असतात. साधे पाणी पिणेही कठीण झाले होते, असेही राऊत यांनी सांगितले.
advertisement
संजय राऊत यांनी उपचारांबाबत म्हणाले की, "काही सर्जरी झाल्या आहेत आणि काही अजून बाकी आहेत. त्या होतीलच. आपण राजकारणात अनेकांच्या 'सर्जरी' करतो, ही तर आपल्या शरीरातील सर्जरी आहे असेही त्यांनी म्हटले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 25, 2026 11:12 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Sanjay Raut On Cancer: "पाणी पिणंही कठीण झालं होतं..."; संजय राऊतांचा मृत्यूशी झुंज देणारा तो थरार, पहिल्यांदाच केला खुलासा!







