East Facing House: पूर्वमुखी घर का सर्वात शुभ? पण 'वास्तु'चे हे नियम 90% लोक दुर्लक्षित करून चुकतात
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
East Facing House Vastu Tips: घराचे तोंड पूर्व दिशेला असणे ही वास्तुशास्त्रानुसार एक उत्तम स्थिती मानली जाते. पूर्व दिशा ही सूर्याची दिशा असल्याने तिला ऊर्जा, आरोग्य आणि सकारात्मकतेचे मुख्य केंद्र मानले जाते. सकाळी सूर्याची कोवळी किरणे थेट घरात प्रवेश करतात, त्यानं घराचे वातावरणच फ्रेश होत नाही, तर तिथे राहणाऱ्या व्यक्तींच्या मनावरही त्याचा प्रसन्न परिणाम होतो. मात्र, एखादे घर केवळ पूर्वमुखी आहे म्हणून ते पूर्णतः शुभ ठरत नाही; त्या घराची अंतर्गत मांडणी कशी आहे, यावरही त्याचे यश अवलंबून असते.
advertisement
घराचे बांधकाम वास्तूच्या नियमांनुसार असेल, तर त्याचे अनेक फायदे होतात. घराच्या पूर्व भागात मोकळी जागा, बाग किंवा पार्किंग असल्यास आर्थिक स्थिती चांगली होते. घराची पूर्व दिशा दक्षिण दिशेच्या तुलनेत थोडी सखल असते, तेव्हा समाजात मान-सन्मान वाढतो. पूर्व दिशेला मोकळेपणा असल्यास घरातील लोक अधिक उत्साही आणि निरोगी राहतात.
advertisement
पूर्वमुखी घरातील वास्तू दोष आणि त्याचे परिणाम - चुकीच्या नियोजनामुळे पूर्वमुखी घर त्रासाचे कारणही बनू शकते. पूर्व दिशा खूप उंच असणे, ईशान्य कोपऱ्यात (उत्तर पूर्व) शौचालय असणे, आग्नेय कोपऱ्यात (दक्षिण पूर्व) मुख्य दरवाजा असणे किंवा पूर्व दिशेला कचरा आणि जड वस्तू ठेवणे हे मोठे वास्तू दोष मानले जातात. यामुळे आर्थिक चणचण, मानसिक तणाव आणि मुलांच्या बाबतीत समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे पूर्व दिशा नेहमी स्वच्छ आणि मोकळी ठेवणे आवश्यक आहे.
advertisement
पूर्वमुखी घराचे वास्तु नियोजन -मुख्य प्रवेशद्वार: प्रवेशद्वारासाठी सर्वात उत्तम जागा पूर्व दिशेचा मध्य भाग किंवा ईशान्य कोपरा आहे. आग्नेय दिशेला दरवाजा बनवणे टाळावे. मुख्य दरवाजा नेहमी मजबूत आणि इतर दरवाज्यांपेक्षा मोठा असावा.स्वयंपाकघर: स्वयंपाकघरासाठी आग्नेय दिशा (दक्षिण पूर्व) सर्वात योग्य आहे. स्वयंपाक करताना चेहरा पूर्व दिशेला असावा. ईशान्य कोपऱ्यात स्वयंपाकघर बनवू नका, यामुळे घरातील ऊर्जेचे संतुलन बिघडते.
advertisement
बेडरूम: मास्टर बेडरूमसाठी नैऋत्य दिशा (दक्षिण पश्चिम) सर्वोत्तम मानली जाते. पूर्व दिशेला मास्टर बेडरूम बनवणे टाळावे. झोपताना डोके दक्षिण किंवा पश्चिम दिशेला असावे.पूजा घर: देवघरासाठी ईशान्य कोपरा ही सर्वात पवित्र जागा आहे. पर्याय म्हणून पूर्व दिशा देखील चालते. पूजा करताना तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे.
advertisement
शौचालय: शौचालयासाठी वायव्य (उत्तर पश्चिम) किंवा दक्षिण पश्चिम दिशा निवडावी. पूर्व किंवा ईशान्य कोपऱ्यात शौचालय बांधल्याने मोठे नुकसान होऊ शकते.मुलांची अभ्यासाची खोली: मुलांची अभ्यासाची खोली पूर्व किंवा ईशान्य दिशेला असावी. अभ्यास करताना मुलांचे तोंड पूर्व दिशेला असावे, ज्यामुळे त्यांची एकाग्रता वाढते.
advertisement
पूर्व दिशेसाठी काही खास टिप्स - घराच्या पूर्व आणि उत्तर दिशेला शक्य तितकी जास्त मोकळी जागा ठेवावी. जमिनीखालील पाण्याची टाकी पूर्व दिशेला असणे शुभ मानले जाते. पूर्व भिंतीवर उगवत्या सूर्याचे चित्र लावल्याने सकारात्मकता वाढते. घराच्या पूर्व भागात हिरवीगार रोपे लावणे फायदेशीर ठरते.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)








