Central Railway: मध्य रेल्वेवर खोळंबा, 'या' मेल, एक्स्प्रेस अन्य मार्गावरून धावणार, प्रवासाआधी पाहा अपडेट
- Reported by:Namita Suryavanshi
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Railway Update: अनेक एक्स्प्रेस आणि मेल गाड्यांचे मार्ग बदलले जाणार आहेत किंवा त्या ठराविक स्थानकांवर रेग्युलेट केल्या जाणार आहेत.
मुंबई: पनवेल–कळंबोली रेल्वे विभागात डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन (DFCC) प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर असून, या कामासाठी मध्य रेल्वेकडून रविवारी आणि सोमवारी मध्यरात्री अप आणि डाऊन मुख्य मार्गांवर विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक्स घेण्यात येणार आहेत. या ब्लॉक्सदरम्यान रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम होणार असून, अनेक एक्स्प्रेस आणि मेल गाड्यांचे मार्ग बदलले जाणार आहेत किंवा त्या ठराविक स्थानकांवर रेग्युलेट केल्या जाणार आहेत.
110 मीटर लांबीच्या ओपन वेब गर्डरची उभारणी
DFCC प्रकल्पाच्या अनुषंगाने सुमारे 110 मीटर लांबीचा आणि 1500 मेट्रिक टन वजनाचा ओपन वेब गर्डर उभारण्यात येणार आहे. हा गर्डर पनवेल–कळंबोली दरम्यान बसविण्यात येणार असून, यासाठी अप व डाऊन मुख्य मार्गांवर ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक आवश्यक असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे. या कामासोबत शेंडो ब्लॉकही घेण्यात येणार आहे.
advertisement
पनवेल येथे किमी 67/55–57 दरम्यान सबवे बांधकामासाठी चालू रेल्वे मार्गाखाली (रनिंग लाइन) तात्पुरता स्टील गर्डर बसविण्यात येणार आहे. याच कालावधीत पनवेल स्थानकावर नवीन पादचारी पूल बांधकामासाठी गर्डर उभारणीचे कामही करण्यात येणार आहे.
advertisement
गाड्यांचे मार्ग बदल आणि रेग्युलेशन
ब्लॉक कालावधीत अनेक गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत.
गाडी क्रमांक 22193 दौंड–ग्वाल्हेर एक्स्प्रेस कर्जत–कल्याण–वसई रोड मार्गे वळविण्यात येईल.
गाडी क्रमांक 20122 मडगाव जंक्शन–छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोकण कन्या एक्स्प्रेस सोमटणे स्थानकावर 03:52 ते 05:20 वाजेपर्यंत रेग्युलेट करण्यात येईल.
गाडी क्रमांक 12134 मंगळुरू–छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस आपटा स्थानकावर 02:50 ते 05:15 वाजेपर्यंत थांबविण्यात येईल.
advertisement
गाडी क्रमांक 11004 सावंतवाडी रोड–दादर तुतारी एक्स्प्रेस जिते स्थानकावर 04:14 ते 05:10 वाजेपर्यंत रेग्युलेट केली जाईल.
गाडी क्रमांक 12620 मंगळुरू–लोकमान्य टिळक टर्मिनस मत्स्यगंधा एक्स्प्रेस पेण स्थानकावर 04:32 ते 05:05 वाजेपर्यंत थांबविण्यात येईल.
गाडी क्रमांक 10103 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस–मडगाव मांडवी एक्स्प्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 08:20 वाजता सुटेल.
हुबळी–दादर एक्स्प्रेस उशिराने धावणार
advertisement
विभागातील गाड्यांचे रेग्युलेशन केल्यामुळे गाडी क्रमांक 17317 हुबळी–दादर एक्स्प्रेस सुमारे 15 ते 20 मिनिटे उशिराने धावणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
कळंबोली–पनवेल दरम्यान 4 तासांचा ब्लॉक
रविवार आणि सोमवारच्या मध्यरात्री कळंबोली–पनवेल विभागात पहाटे 01:20 ते 05:20 वाजेपर्यंत 4 तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत अनेक एक्स्प्रेस आणि मेल गाड्या अन्य मार्गावरून धावतील किंवा नियंत्रित करण्यात येतील.
advertisement
DFCC प्रकल्पाचे दीर्घकालीन महत्त्व
DFCC प्रकल्पामुळे भविष्यात मालवाहतुकीसाठी स्वतंत्र आणि वेगवान रेल्वे मार्ग उपलब्ध होणार आहे. त्यामुळे प्रवासी गाड्यांवरील ताण कमी होऊन वेळेत आणि सुरक्षित सेवा देणे शक्य होणार आहे. मात्र, सध्या सुरू असलेल्या या कामांमुळे प्रवाशांनी प्रवासापूर्वी आपल्या गाडीची माहिती तपासूनच प्रवास करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 25, 2026 10:48 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Central Railway: मध्य रेल्वेवर खोळंबा, 'या' मेल, एक्स्प्रेस अन्य मार्गावरून धावणार, प्रवासाआधी पाहा अपडेट









