Pune Crime: बुरखा घालून आल्या अन् अचानक साधला डाव; पुण्यात दोघींचं मोठं कांड
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
कोंढवा खुर्द येथील एका प्रसिद्ध सराफी पेढीत दोन महिला बुरखा परिधान करून शिरल्या. त्यांनी दुकानातील कर्मचाऱ्याला विविध दागिने दाखवण्यास सांगितले.
पुणे : पुणे शहरातील कोंढवा परिसरात एका सराफी पेढीत अजब प्रकार घडला. इथे खरेदीच्या बहाण्याने आलेल्या दोन बुरखाधारी महिलांनी सुमारे २ लाख ६८ हजार रुपयांचा सुवर्णहार लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून महिलांचा शोध सुरू आहे.
बोलण्यात गुंतवून साधला डाव: कोंढवा खुर्द येथील एका प्रसिद्ध सराफी पेढीत दोन महिला बुरखा परिधान करून शिरल्या. त्यांनी दुकानातील कर्मचाऱ्याला विविध दागिने दाखवण्यास सांगितले. कर्मचाऱ्याने सुवर्णहार दाखवण्यास सुरुवात केली असता, त्याला बोलण्यात गुंतवून नजर चुकवून या महिलांनी २ लाख ६८ हजार रुपये किमतीचा एक मौल्यवान हार चोरला आणि दुकानातून पोबारा केला.
advertisement
काही वेळाने दागिन्यांची मोजदाद करताना हार चोरीला गेल्याचे दुकानदाराच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने कोंढवा पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. सहायक पोलीस निरीक्षक सचिन थोरात यांनी घटनास्थळी भेट दिली असून, दुकानातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेजच्या आधारे बुरखाधारी महिलांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
advertisement
मेट्रो स्थानकावरून केबलचीही चोरी: दागिने चोरीच्या घटनेसोबतच शहरातील शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्गिकेवरील बाणेर स्थानकातून ५० हजार रुपयांची केबल चोरीला गेल्याचेही समोर आले आहे. २३ जानेवारी रोजी एका टेम्पोतून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी ही केबल लांबवली. या प्रकरणी बाणेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक शैला पाथरे तपास करत आहेत.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 25, 2026 10:23 AM IST








