Mumbai : गोरेगाव ते मुलुंड सुसाट, 75 मिनिटांचा प्रवास केवळ 25 मिनिटांत, गेमचेंजर उड्डाणपूल, कधी होणार खुला?
Last Updated:
Goregaon Mulund Flyover Opening Date : गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्यावरील उड्डाणपुलाचे 75 टक्के काम पूर्ण झाले असून हा पूल लवकरच वाहतुकीस खुला होणार आहे. त्यामुळे प्रवासाचा वेळ 25 मिनिटांपर्यंत कमी होईल.
मुंबई : मुंबई महापालिकेचा महत्त्वाचा असलेला गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्पाचे काम सध्या वेगाने सुरु आहे. या प्रकल्पाअंतर्गत दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके चित्रनगरीदरम्यान उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
75 मिनिटांच्या कोंडीतून कायमची सुटका
या उड्डाणपुलासाठी एकूण 31 खांब उभारण्यात येणार असून त्यापैकी 30 खांबांची उभारणी पूर्ण झाली आहे. सध्या पुलाचे सुमारे 75 टक्के काम पूर्ण झाले आहे. अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी गुरुवारी या पुलाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित पूल विभागाला दिलेल्या मुदतीत काम पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
advertisement
उड्डाणपुलाची तारीख आली समोर
गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता हा मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा चौथा महत्त्वाचा मार्ग ठरणार आहे. विशेषतहा उत्तर मुंबईतील नागरिकांना या प्रकल्पाचा मोठा फायदा होणार आहे. सुमारे 12.20 किलोमीटर लांबीच्या या मार्गामुळे पूर्व-पश्चिम प्रवास अधिक सुलभ होणार असून हा उड्डाणपूल येत्या 31 मे 2026 पर्यंत वाहतुकीस खुला करण्याचे उद्दिष्ट महापालिकेने निश्चित केले आहे.
advertisement
सध्या गोरेगाव ते मुलुंड प्रवासासाठी साधारण 75 मिनिटे लागतात. मात्र हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हे अंतर केवळ 25 मिनिटांत पार करता येणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी कमी होईल, इंधनाची बचत होईल आणि प्रदूषणातही घट होण्यास मदत मिळणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 24, 2026 8:43 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai : गोरेगाव ते मुलुंड सुसाट, 75 मिनिटांचा प्रवास केवळ 25 मिनिटांत, गेमचेंजर उड्डाणपूल, कधी होणार खुला?







