TRENDING:

'जगातील सर्वात मोठ्या 2 कंपन्या 5 मिनिटांत एकत्र आल्या', मुकेश अंबानींनी सांगितलं कशी झाली पाटर्नशीप

Last Updated:

"भारत भविष्यात इतर जागतिक अर्थव्यवस्थांपेक्षा वेगाने वाढेल. पुढील २० ते ३० वर्षांत भारतासमोर अंदाजे ४.५ ट्रिलियन डॉलर्सची संधी आहे आणि...''

advertisement
News18
News18
advertisement

मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या जिओ–ब्लॅकरॉक कार्यक्रम “इन्वेस्टिंग फॉर ए न्यू एरा”मध्ये  ब्लॅकरॉकचे सीईओ लॅरी फिंक यांच्यासह मुलाखतीदरम्यान मुकेश अंबानी यांनी भारताच्या विकासाबद्दल आपली भूमिका मांडली. ब्लॅकरॉकने जिओच्या सहकार्याने भारतात जिओ ब्लॅकरॉक एएमसी लाँच केलं आहे.

"आम्ही २०२३ मध्ये बोललो होतो आणि मला फक्त ५ मिनिटं लागली. 'लॅरी, ब्लॅकरॉकला भारतात यायचं आहे.' असं यावेळी मुकेश अंबानी म्ङणाले. तर त्यानंतर लॅरी फिंक म्हणाले की, 'त्यासाठी आणखी कमी वेळ लागला. आम्ही त्यावेळी गाडीत होतो आणि प्रवासादरम्यान हे ठरवण्यात आलं होतं," असा किस्सा फिंक यांनी सांगितला.

advertisement

"भविष्यात भारतात १०० रिलायन्स कंपन्या उदयास येत असल्याचे त्यांना दिसत आहे.  भारतीय अर्थव्यवस्था आता स्थिरता आणि मुबलक क्षमतांसह स्पष्टपणे फळ देत आहे. देशाची धोरणे शाश्वत आहेत, धोरणांमध्ये सातत्य आहे आणि सरकारने नेहमीच सावध आणि संतुलित दृष्टिकोन स्वीकारला आहे." असं सागत मुकेश अंबानी यांनी स्टार्टअप उद्योगाबद्दल सर्वात जास्त उत्सुक आहेत. भविष्यात देशात १०० नवीन रिलायन्ससारख्या कंपन्या उदयास येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

advertisement

भारतासमोर एक मोठी संधी 

"भारत भविष्यात इतर जागतिक अर्थव्यवस्थांपेक्षा वेगाने वाढेल. पुढील २० ते ३० वर्षांत भारतासमोर अंदाजे ४.५ ट्रिलियन डॉलर्सची संधी आहे आणि ही वाढ जगाच्या इतर भागांपेक्षा जास्त असेल. पुढील दशकात भारत उर्जेच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात स्वावलंबी होईल आणि भारत तांत्रिक पायाभूत सुविधांच्या बाबतीत जगापेक्षा मागे राहणार नाही. त्यांच्या मते, डिजिटल आणि तांत्रिक पायाभूत सुविधांमध्ये भारताची तयारी इतकी मजबूत आहे की, ती जागतिक मानकांशी जुळवून घेऊ शकेल' असा विश्वास यावेळी मुकेश अंबानींनी व्यक्त केला.

advertisement

एआयची भीती बाळगण्याची गरज नाही

"आपण तंत्रज्ञान स्वीकारले पाहिजे यावर त्यांचा ठाम विश्वास आहे.कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) पूर्णपणे वास्तविक आहे आणि भारतासाठी एक महत्त्वपूर्ण फायदा आहे. पण भारत इतर देशांपेक्षा वेगाने तंत्रज्ञान स्वीकारत आहे आणि एआयची भीती बाळगण्याची गरज नाही. त्यांनी त्याची तुलना औद्योगिक क्रांतीशी केली आणि म्हटले की ज्याप्रमाणे त्या काळात मानवतेने प्रगती केली आणि उत्पादकता वाढली, त्याचप्रमाणे एआय देखील प्रगतीचे नवीन मार्ग उघडेल, असंही यावेळी अंबानी म्हणाले.

advertisement

बचत करणे गरजेचं

"भारताने आपली बचत मानसिकता कायम ठेवली पाहिजे. भारतीय संधी खरोखरच एका नवीन युगात प्रवेश करत आहेत.  जगभरातील अनेक देश १०% वार्षिक वाढीची आकांक्षा बाळगत असताना, भारताने तुटीच्या मानसिकतेपेक्षा बचत मानसिकतेने पुढे  गेलं पाहिजे.  प्रत्येक भारतीयाने चक्रवाढीच्या शक्तीचा फायदा घेतला पाहिजे. त्यांनी मान्य केले की गुंतवणुकीची उपलब्धता सोपी नाही, परंतु प्रत्येक भारतीयाने त्याची मागणी केली पाहिजे. बँक खात्यात बसलेले पैसे फक्त साधे व्याज मिळवतात, तर शेअर बाजारात गुंतवलेले पैसे चक्रवाढ होतात. भारताची बाजारपेठ कार्यक्षम आहे आणि दीर्घकालीन गुंतवणुकीमुळे चांगले परतावे मिळण्याची शक्यता असते' असंही यावेळी मुकेश अंबानी म्हणाले.

मराठी बातम्या/मनी/
'जगातील सर्वात मोठ्या 2 कंपन्या 5 मिनिटांत एकत्र आल्या', मुकेश अंबानींनी सांगितलं कशी झाली पाटर्नशीप
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल