TRENDING:

रतन टाटा नसल्याचा परिणाम, एका वर्षात टाटा ग्रुप संकटात; 6.25 लाख कोटी उडाले, वारशाची मोठी परीक्षा

Last Updated:

Ratan Tata Death Anniversary: रतन टाटा यांच्या जाण्याला आज एक वर्ष पूर्ण झाले, पण त्यांच्या अनुपस्थितीची पोकळी अजूनही टाटा समूहाला भेडसावत आहे. एका वर्षात समूहाच्या बाजारमूल्यात तब्बल 6.25 लाख कोटींची घसरण झाली आहे. जी त्यांच्या वारशालाच आव्हान देणारी ठरली आहे.

advertisement
News18
News18
advertisement

मुंबई: आज रतन टाटा यांच्या पहिल्या पुण्यतिथीचा दिवस आहे. 9 ऑक्टोबर 2024 रोजी वयाच्या 86व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला होता. आज त्यांना गेलं एक वर्ष पूर्ण झालं असलं तरी टाटा समूहातील प्रत्येक सदस्याला आणि देशातील उद्योगविश्वाला त्यांच्या अनुपस्थितीची जाणीव अजूनही तीव्रतेने होते आहे. रतन टाटा हे केवळ एक महान उद्योगपती नव्हते, तर ते प्रामाणिकपणा, विश्वास आणि नैतिकतेचे प्रतीक होते.

advertisement

त्यांच्या काळात टाटा समूहाने स्थिरता, प्रगती आणि विश्वासार्हतेची ओळख कायम ठेवली. एअर इंडियाची खरेदी असो, टाटा मोटर्सच्या इलेक्ट्रिक वाहन क्रांतीचा उदय असो किंवा जागतिक स्तरावर टाटा ब्रँडची प्रतिष्ठा रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली समूहाने नवे शिखर गाठले. मात्र त्यांच्या जाण्यानंतर समूहाचे साम्राज्य जणू काही आपली चमक गमावू लागले आहे. गेल्या एका वर्षात टाटा समूहाच्या बाजारमूल्यात आणि गुंतवणूकदारांच्या विश्वासात मोठी घसरण झाली आहे.

advertisement

टाटा समूहाची मार्केट व्हॅल्यू कोसळली

गेल्या वर्षभरात टाटा समूहाची एकूण बाजारमूल्य सुमारे 75 अब्ज डॉलर म्हणजेच 6.25 लाख कोटी रुपयांनी घटली आहे. ही केवळ शेअर किमतींची घसरण नाही, तर गुंतवणूकदारांच्या विश्वासात आलेल्या तडाख्याची कहाणीही आहे.

advertisement

टाटा सन्सच्या 16 प्रमुख कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये एवढी घट झाली आहे. जितकी गेल्या दोन वर्षांत कधीही झाली नव्हती. Equitymaster च्या अहवालानुसार या एकूण घसरणीपैकी जवळपास 20 अब्ज डॉलर इतकी किंमत फक्त 19 सप्टेंबरनंतर कमी झाली. त्या दिवशी अमेरिकेने कामाच्या व्हिसा नियमांमध्ये कडक बदल केले होते. इतर बाजार काही प्रमाणात सावरत असतानाही टाटा समूहाचा परफॉर्मन्स तज्ज्ञांना आश्चर्यचकित करणारा ठरला.

advertisement

तेजस नेटवर्क्सचे शेअर्स 51% कोसळले

गेल्या 12 महिन्यांत समूहातील जवळजवळ प्रत्येक मोठ्या कंपनीचे शेअर्स घसरले आहेत. काहींच्या किमती त्यांच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकापेक्षा अर्ध्यापेक्षा जास्त कोसळल्या आहेत. त्यात सर्वात मोठी घसरण तेजस नेटवर्क्समध्ये झाली आहे. कंपनीचे शेअर्स 51% खाली आले आहेत.

आर्थिकदृष्ट्या कंपनीची स्थिती चिंताजनक आहे. तिचे उत्पन्न मागील वर्षाच्या तुलनेत 87% घटून केवळ 200 कोटींवर आले आहे, तर कंपनीला 190 कोटींचा तोटा झाला आहे (मागील वर्षी 77 कोटींचा नफा होता). यामागील कारणांमध्ये डिलिव्हरीमध्ये उशीर, शिपमेंट क्लिअरन्समध्ये विलंब आणि प्रकल्पांतील अडथळे यांचा समावेश आहे. विशेषतः बीएसएनएलच्या 4G प्रकल्पावर याचा गंभीर परिणाम झाला, ज्यामुळे कंपनीची देणी 4,450 कोटींवर गेली आहेत. कंपनीने आश्वासन दिले आहे की पुढील काही महिन्यांत ही स्थिती सुधारेल.

ट्रेंट लिमिटेडचे शेअर्स 45% घसरले

ट्रेंट लिमिटेड, जे वेस्टसाइड, जूडिओ, उत्सा, समोह आणि स्टार सुपरमार्केटसारखे रिटेल ब्रँड चालवते, याचे शेअर्स 45% कोसळले आहेत. ही कंपनी भारतात झारा आणि मासिमो डुट्टीचे प्रॉडक्ट्स देखील विकते.

पहिल्या तिमाहीत ट्रेंटचा महसूल 19% वाढून 48.8 अब्ज झाला आणि नफा 8.7% वाढून 4.2 अब्ज झाला. देशभरात 242 शहरांमध्ये कंपनीचे 1,043 स्टोअर्स आहेत. तरीदेखील शेअर बाजारातील दबाव कमी झालेला नाही.

इतर टाटा कंपन्यांची स्थिती

टाटा टेक्नॉलॉजीजचे शेअर्स 32% खाली आले आहेत.

टाटा एलक्सी 28% घसरली आहे.

टाटा मोटर्स 26%

टीसीएस 24%

वोल्टास 24%

टाटा केमिकल्स 18%

आणि टाटा पॉवर 16% घटले आहेत.

टीसीएस आणि इतरांची झलक

भारताची सर्वात मोठी आयटी कंपनी टीसीएसने पहिल्या तिमाहीत महसूल 1.3% वाढवून 634.4 अब्ज केला आणि नफा 5.9% वाढून 128.2 अब्ज झाला. मात्र भारतीय बाजारात 21.7% घसरण दिसली, तर मध्यपूर्व आणि आफ्रिकेत 9.4% वाढ झाली. कंपनी आपल्या एआय आणि जनरेटिव्ह एआय प्लॅटफॉर्म्स WisdomNext आणि Ignio मध्ये मोठ्या प्रमाणात विस्तार करत आहे.

टाटा एलक्सी, जी डिझाइन आणि टेक्नॉलॉजी सेवांमध्ये अग्रणी आहे, तिचा महसूल 3.7% घटून 8.9 अब्ज झाला आणि नफा 22% घटून 1.4 अब्ज राहिला. तरीही कंपनीने मर्सिडीज-बेंझ आणि सुजुकी यांसारखे नवे प्रकल्प जिंकले असून अंतराळ, संरक्षण, ड्रोन आणि ईव्हीटीओएल (Electric Vertical Take-Off and Landing) क्षेत्रांत पाऊल टाकले आहे.

वोल्टास, एसी आणि कूलिंग उत्पादन क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी, हिचा महसूल 20% घटून 39.4 अब्ज झाला आणि नफा 58% घसरून 1.4 अब्ज राहिला. यामागील कारण 2025 मध्ये उष्णतेचा हंगाम उशिरा सुरू होऊन लवकर संपल्याने विक्रीवर परिणाम झाला. तरीदेखील कंपनीकडे एसी बाजारातील 17.8% हिस्सा असून ती अव्वल स्थानावर आहे. आगामी सणासुदीमुळे आणि जीएसटी कपातीमुळे सुधारणा होण्याची शक्यता आहे.

रतन टाटा हे संपूर्ण टाटा समूहासाठी एकत्र आणणारा, प्रेरणा देणारा आणि मूल्यांचा पाया होते. त्यांच्या जाण्यानंतर समूहाला आता एका नव्या युगात प्रवेश करावा लागणार आहे. जिथे आधुनिकतेसह मूल्यांचे संतुलन राखणे ही सर्वात मोठी कसोटी असेल.

मराठी बातम्या/मनी/
रतन टाटा नसल्याचा परिणाम, एका वर्षात टाटा ग्रुप संकटात; 6.25 लाख कोटी उडाले, वारशाची मोठी परीक्षा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल