राजू भोनाजी अवचार असं गुन्हा दाखल झालेल्या 28 वर्षीय आरोपी तरुणाचं नाव आहे. तो जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे येथील रहिवासी आहे. त्याच्या २४ जुलै रोजी रात्री आठच्या सुमारास शेगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
पीडित तरुणीने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, आरोपी राजू अवचार आणि पीडित तरुणी मागील काही काळापासून एकमेकांना ओळखतात. दोघंही प्रेमसंबंधात होते. आरोपी राजू याने पीडित तरुणीला लग्न करणार असल्याचं म्हटलं होतं. त्याने पीडितेचा विश्वास संपादन केला होता. यातून ११ जून रोजी आरोपी पीडित तरुणीला घेऊन शेगाव येथील एका गेस्ट हाऊसमध्ये गेला. याठिकाणी त्याने पीडितेशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
advertisement
या घटनेनंतर जवळपास दीड महिन्यांनी पीडित तरुणीने शेगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली. तिने आरोपी तरुण राजू याच्याविरोधात फिर्याद दाखल केली. शेगाव शहर पोलिसांनी बलात्कारासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. तरुणाला अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलीस या घटनेचा सविस्तर तपास करत आहेत.
