TRENDING:

Navi Mumbai : पतीच्या निधनानंतर पत्नीचा हृदयद्रावक शेवट, नवी मुंबईतील थरकाप उडवणाऱ्या घटनेनं चिमुकला पोरका

Last Updated:

Navi Mumbai : लग्नानंतर एका विवाहित महिलेला पुढचा प्रवास असा होईल कधीच वाटले नव्हते. नवी मुंबईतून समोर आलेली ही घटना प्रत्येकाला हादरुन सोडून गेली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
Choose
News18 on Google
advertisement
नवी मुंबई : पतीच्या निधनानंतर काही कुटुंबे सुनेला आधार देतात, तिची काळजी घेतात आणि तिची स्वप्ने पूर्ण करण्यासाठीही साथ देतात. मात्र कामोठे परिसरातून समोर आलेल्या या घटनेने सर्वांनाच धक्का बसला असून संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Navi Mumbai News
Navi Mumbai News
advertisement

सासरच्या छळाने संपवलं जीवन

मिळालेल्या माहितीनुसार, कामोठे परिसरातील ही घटना असून पतीच्या निधनानंतर मालमत्तेच्या वादातून होणाऱ्या सततच्या त्रासाला कंटाळून 38 वर्षीय पुष्पा शिरोळे यांनी आत्महत्या केली आहे. या प्रकरणी कामोठे पोलिस स्टेशन यांनी सासू, नणंद आणि दोन दिरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पुष्पा यांचे लग्न 2014 मध्ये सतीश शिरोळे यांच्याशी झाले होते.त्यानंतर जून 2023 मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने सतीश यांचे निधन झाले. त्यानंतर पुष्पा आपल्या दोन लहान मुलांसह कामोठे येथे राहत होत्या. पतीच्या मृत्यूनंतर मिळणारे विम्याचे पैसे, इतर आर्थिक लाभ आणि घराच्या मालकी हक्कावरून सासरच्या मंडळींनी त्यांच्यावर दबाव टाकल्याचे समोर आले आहे.

advertisement

पैशांसाठी सासरकडून सतत तगादा

सासू कोंडाबाई, नणंद प्रतिभा तसेच दीर संदीप आणि विनायक हे वारंवार पैशांची मागणी करत असल्याचा आरोप आहे. या छळामुळे त्रस्त झालेल्या पुष्पा यांनी ऑगस्ट 2023 मध्ये कामोठे पोलिसांकडे तक्रार केली होती.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
150 रुपयांना खरेदी करा अन् 300 ला विका, पिंपरीत ट्रेंडी कुर्तींचं होलसेल मार्केट
सर्व पहा

मात्र 16 फेब्रुवारी रोजी सकाळी पुष्पा यांनी आपल्या लहान मुलीला,''मी आता कधीच घरी येणार नाही,'' असे सांगून घर सोडले. दुसऱ्या दिवशी त्यांचा मृतदेह कुलाबा परिसरातील समुद्रात आढळून आला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
Navi Mumbai : पतीच्या निधनानंतर पत्नीचा हृदयद्रावक शेवट, नवी मुंबईतील थरकाप उडवणाऱ्या घटनेनं चिमुकला पोरका
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल