न्यायालयीन आयोगाकडून पोलिसांना क्लीनचीट
अक्षय शिंदेचं एन्काऊंटर (Encounter) करणाऱ्या पोलिसांना निर्दोषत्व बहाल करण्यात आलं आहे. न्यायमूर्ती दिलीप भोसलेंच्या न्यायालयीन आयोगाकडून (Justice Dilip Bhosales Judicial Commission) पोलिसांना क्लीनचीट देण्यात आली आहे. स्वसंरक्षणासाठी अक्षय शिंदेंवर गोळीबार केल्याचा पोलिसांचा दावा न्या. दिलीप भोसलेंच्या न्यायालयीन आयोगाने मान्य केला आहे.
एसआयटी स्थापन करुन चौकशीचे आदेश
advertisement
राज्य मानवाधिकार आयोगाकडूनही पोलिसांना यापूर्वीच क्लीन चीट मिळाली आहे. त्यात आता न्या. दिलीप भोसलेंच्या न्यायालयीन आयोगानेही पोलिसांना क्लीनचीट दिल्याने पोलिसांना पुन्हा एकदा दिलासा मिळाला आहे. मुंबई हायकोर्टाकडून मात्र एसआयटी स्थापन करुन चौकशीचे आदेश देण्यात आले होते. कोर्टाने नव्हे तर डीजीपींन एसआयटी स्थापन करावी, असे सुप्रीम कोर्टाचे आदेश होते. अशातच आता पोलिसांना क्लिन चीट देण्यात आली आहे.