नेमकं काय म्हणाले परब?
साई रिसॉर्ट प्रकरणात गेल्या काही वर्षांपासून किरीट सोमय्या हे माझ्यावर आरोप करत आहेत. त्यांनी या प्रकरणात लोकायुक्तांकडे देखील तक्रार केली होती. मात्र त्यांची याचिका फेटाळून लावण्यात आली आहे. सोमय्या तोंडावर पडले आहेत. या प्रकरणात माझी नाहक बदनामी करण्यात आली. लोकायुक्तांचा निर्णय आला आहे.
हे रिसॉर्ट माझं नाहीये, तर ते सदानंद परब यांचं आहे. मी ते आधीच विकलं होतं. मी त्या दिवसापासून सांगत आलोय की, माझा त्या रिसॉर्टशी काही संबंध नाही. मी सोमय्यांवर 100 कोटींच्या अब्रुनुकसानीचा दावा केला आहे. नाक घासावं अन्यथा 100 कोटी रुपये द्यावेत. माझ्यावर जे आरोप करण्यात आले ते राजकीयदृष्ट्या केले गेले. वेगवेगळ्या संघटनांनी चौकशी केली आहे, त्यामुळे आम्हाला वेगळी चौकशी करण्याची गरज नसल्याचं लोकायुक्तांनी म्हटलं आहे. माझ्या कुटुंबाला मानसीक त्रास झाला त्याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित करतानाच आपण पुन्हा एकदा न्यायालयात जाणार असल्याचं परब यांनी म्हटलं आहे.
advertisement
