TRENDING:

Medical Officer पदाच्या अर्ज प्रक्रियेला दोन दिवस शिल्लक, लगेच करा Apply; जाणून घ्या प्रक्रिया

Last Updated:

महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये 'मेडिकल ऑफिसर' पदासाठी मेगाभरती केली जात आहे. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी शेवटचे काही दिवसच शिल्लक राहिले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: जर तुम्हाला सुद्धा 'मेडिकल ऑफिसर' पदासाठी नोकरी करण्याची इच्छा असेल, तर एकदा ही बातमी आवर्जुन वाचा. महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये 'मेडिकल ऑफिसर' पदासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. 31 मार्च 2026 रोजी, 1440 रिक्त जागांसाठी 'मेडिकल ऑफिसर' पदांसाठी भरती सुरू आहे. अवघे काही दिवसच शिल्लक राहिले असून जर तुम्ही सुद्धा 'मेडिकल ऑफिसर' पदासाठी जॉब ट्राय करण्यासाठी इच्छुक असाल, तर एकदा आवर्जुन पदासाठीची पात्रता जाणून घ्या आणि लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज भरा.
maharashtra medical officer recruitment 2026 apply for 1440 posts in health department
maharashtra medical officer recruitment 2026 apply for 1440 posts in health department
advertisement

भरतीच्या जाहिरातीची ऑनलाईन PDF

ऑनलाईन पद्धतीने सुरू असलेल्या अर्ज प्रक्रियेचा शेवटचा दिवस 31 मार्च 2026 रोजी असणार आहे. 31 मार्च 2026 ही ऑनलाईन अर्ज करण्याची आणि ऑनलाईन अर्ज शुल्क भरण्याची शेवटची तारीख देण्यात आलेली आहे. वैद्यकीय अधिकारी गट- अ (मेडिकल ऑफिसर)- MBBS आणि वैद्यकीय अधिकारी गट-अ (मेडिकल ऑफिसर)- विशेषज्ञ अशा दोन रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. वैद्यकीय अधिकारी गट- अ (मेडिकल ऑफिसर)- MBBS या पदांसाठी 766 रिक्त जागा आहेत. तर, वैद्यकीय अधिकारी गट-अ (मेडिकल ऑफिसर)- विशेषज्ञ पदासाठी 774 रिक्त जागा असणार आहेत. अशा एकूण 1440 रिक्त जागांवर नोकरभरती केली जात आहे.

advertisement

ऑनलाईन अर्ज भरण्याची लिंक

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
APMC Market: कृषी मार्केटनं वाढवलं टेन्शन; द्राक्षे, केळीची आवक घटली, कांदा अन् लिंबूला किती मिळाला भाव?
सर्व पहा

वैद्यकीय अधिकारी गट- अ (मेडिकल ऑफिसर)- MBBS पदासाठी MBBS ची पदवी असणे अनिवार्य असणार आहे. तर, वैद्यकीय अधिकारी गट-अ (मेडिकल ऑफिसर)- विशेषज्ञ पदासाठी वैद्यकीय पदव्युत्तर पदवी/ पदविका किंवा समतुल्य असणे अनिवार्य असेल. दोन्हीही पदांसाठी 18 ते 38 वर्षाची वयोमर्यादा आहे. 20 मार्च 2026 रोजी उमेदवाराचं नमूद केलेलं वय पूर्ण केलेलं असावं. दरम्यान, मागासवर्गीय आणि आर्थिक दुर्बल घटकातील उमेदवारांना 5 वर्षे सूट मिळणार आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 1000 रूपये परिक्षा शुल्क आहे. तर, मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक, अनाथ, दिव्यांग, महिला आणि खेळाडू असलेल्या उमेदवारांना 700 रूपये परिक्षा शुल्क आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही नोकरभरती पार पडणार आहे.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
Medical Officer पदाच्या अर्ज प्रक्रियेला दोन दिवस शिल्लक, लगेच करा Apply; जाणून घ्या प्रक्रिया
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल