अॅन्टॉप हिलमध्ये छापा
पोलिस आयुक्त देवेन भारती यांच्या आदेशानुसार अन्न आणि औषध प्रशासन (FDA) विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने कारवाई करण्यात आली. अॅन्टॉप हिल परिसरातील जीटीबी नगर भागात दोन डेअरींवर छापा टाकण्यात आला. 'ओम कोल्ड्रींक हाऊस' आणि 'श्री गणेश डेअरी' या दुकानांमध्ये पनीरच्या नावाखाली ग्राहकांना चीझ अॅनालॉग विकले जात असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले.
advertisement
सीबी कंट्रोलचे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रविण मोहिते, सहायक पोलीस निरीक्षक रोहन बगाडे, महेश सांगळे तसेच पोलिस उपनिरीक्षक नंदकिशोर बोरोले यांच्या पथकाने ही कारवाई केली. या छाप्यात तब्बल 550 किलो भेसळयुक्त चीझ अॅनालॉग जप्त करण्यात आले. ही मात्रा बाजारात गेली असती तर असंख्य ग्राहकांच्या आरोग्याशी मोठा धोका निर्माण झाला असता.
खरी आणि बनावट ओळख कशी करावी?
ग्राहकांनी पनीर खरेदी करताना काही महत्त्वाच्या बाबी लक्षात ठेवाव्यात :
1)नेहमी विश्वसनीय ब्रँड व लेबलबद्ध पॅकिंग असलेलेच पनीर घ्यावे.
2)सुट्टे किंवा लेबल नसलेले पनीर खरेदी करण्याचे टाळावे.
3)खरे पनीर दाणेदार स्वरूपाचे असते आणि त्याला नैसर्गिक दुधाचा गंध येतो.4
4)तर बनावट पनीर अथवा चीझ अॅनालॉग हाताला खरासारखे किंवा मेणासारखे वाटते.
ही साधी ओळख लक्षात घेतल्यास भेसळयुक्त पदार्थ आपल्या स्वयंपाकघरात पोहोचण्यापासून रोखता येईल.
व्यापाऱ्यांना इशारा
भेसळयुक्त पनीर हॉटेल व्यावसायिक, केटरिंग करणारे लोक स्वस्त दरात खरेदी करतात. पण यामुळे ग्राहकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे अशा पदार्थांचा साठा ठेवणे किंवा विक्री करणे हा गंभीर गुन्हा मानला जाणार आहे. पोलिसांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, अशा प्रकारच्या गैरव्यवहारात सहभागी आढळल्यास संबंधित व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.
