नेमकी घटना काय?
रविवारी दुपारी मुलुंडच्या गजबजलेल्या परिसरात हा प्रकार घडला. पूर्ववैमनस्यातून झालेल्या या वादात आरोपींनी पीडित तिघांवर धारदार शस्त्रांनी सपासप वार केले. या हल्ल्यात तिघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, भररस्त्यात धारदार शस्त्राने हल्ला करत असतानाचे हे भीषण दृश्य परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. या फुटेजच्या आधारे पोलिसांनी तातडीने तपास चक्र फिरवली.
advertisement
राजकीय धागेदोरे आणि अटक
या प्रकरणात पोलिसांनी सुलतान मलिक आणि महीपाल सिंह या दोघांना अटक केली आहे. अटकेत असलेला सुलतान मलिक हा अजित पवार गटाकडून महानगरपालिका निवडणूक लढवलेले सज्जू मलिक यांचे भाऊ युसुफ मलिक यांचा मुलगा आहे. आरोपींचे थेट राजकीय नेत्यांशी संबंध असल्याचे समोर आल्याने या प्रकरणाला आता राजकीय वळण लागण्याची शक्यता आहे.
२५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी
अटकेनंतर दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर सुलतान मलिक आणि महीपाल सिंह या दोघांनाही २५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. जुन्या वादातून हा हल्ला झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मात्र, या हल्ल्यामागे नेमके काय कारण होतं आणि यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत. या घटनेनंतर मुलुंड कॉलनी आणि साईप्रेस परिसरात या काही काळ तणावाचं वातावरण होतं.
