भाजप आमदार यांनी घाटकोपर येथे भारतातील सर्वात मोठी दहीहंडी सोहळ्याचे आयोजन केलं आहे. या दहिहंडीच्या ठिकाणी मोठमोठे सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली. तर राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते या दहिहंडीचे उद्घाटन करण्यात आले. दरम्यान, या दहिहंडीत एका पोस्टरने सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं. "फडणवीस साहेब, तुम्ही देवमाणूस" अशा आशयाचे पोस्टर्स या दहिहंडी सोहळ्यात पाहायला मिळाले. यापूर्वी फडणवीस यांचा देवमाणूस असा उल्लेख केलेले बॅनर्स झळकले आहेत.
advertisement
दहीहंडी उत्सवादरम्यान 'गोविंदा' जखमी होण्याची शक्यता लक्षात घेता, बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) खबरदारीचा उपाय म्हणून BMC रुग्णालयांमध्ये 125 खाटा आगाऊ तयार ठेवल्या आहेत. बीएमसीने सायन रुग्णालयात दहा, केईएम रुग्णालयात सात खाटा, नायर रुग्णालयात चार खाटा आणि शहर आणि उपनगरातील विविध सरकारी रुग्णालयांमध्ये उर्वरित खाटा तयार केल्या आहेत. या रुग्णालयांमध्ये जखमी गोविंदांवर उपचार करण्यासाठी तीन शिफ्टमध्ये आरोग्य अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले असून, त्यांना इंजेक्शन, औषधे आणि शस्त्रक्रियेचे साहित्य तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
वाचा - गोविंदांची पंढरी दुमदुमली, पहा ठाण्यातील टेंभी नाका दहीहंडीचे खास फोटो
दहीहंडी उत्सवात दरवर्षीप्रमाणे यंदाही राजकीय पक्षांचे नेते मोठ्या दिमाखात सहभागी झाले आहेत. जन्माष्टमीच्या निमित्ताने मुंबई, ठाण्यात अनेक दशकांपासून साजऱ्या होणाऱ्या या लोकप्रिय उत्सवासाठी लाखोंची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. मानवी थराच्या उंचीच्या आधारावर हे बक्षीस निश्चित करण्यात आले आहे.
