धुलिंवदनाच्या दिवशी सकाळपासून दुपारी 2 वाजेपर्यंत मेट्रो बंद असणार आहे. पुढे दुपारी 2 ते रात्री 10 वाजेपर्यंत 15 मिनिटांच्या अंतराने मेट्रो रेल्वे बेलापूर- पेंधर मार्गावर धावेल. धुलिवंदन सणाच्या दिवशी सर्वत्र रंगाची उधळण केली जाते. त्यामुळे मेट्रोमध्येही कोणी रंगाची उधळण करू नये. या अनुषंगाने सिडकोने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. धुलिवंदनच्या दिवशी प्रवाशांची संख्या सुद्धा कमी असेल, यासाठीच सिडकोने मेट्रो सकाळच्या सत्रामध्ये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे धुलिवंदनच्या दिवशी मेट्रोने न जाता पर्यायी वाहतुकीचा पर्याय प्रवाशांना वापर करावा लागणार आहे.
advertisement
दुपारी दोननंतर प्रवाशांसाठी मेट्रो सेवा खुली असणार आहे. दुपारी 2 ते रात्री 10 वाजेपर्यंत 15 मिनिटांच्या अंतराने मेट्रो प्रवाशांसाठी उपलब्ध असणार असल्याची माहिती सिडकोच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. शिवाय, दुपारच्या काळात प्रवाशांना प्रवासासाठी कोणताही त्रास होणार नसल्याची माहिती दिली आहे. फक्त सकाळच्या सत्रामध्ये धुलिंवदन सणानिमित्त प्रवाशांना थोडा त्रास सहन करावा लागणार आहे. पण त्या काळातही प्रवाशांनी पर्यायी प्रवासाचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. दरम्यान, मेट्रो प्रवाशांना घराबाहेर निघताना याची खबरदारी घ्यावी असं आवाहन सिडको प्रशासनाने केल आहे.
