इंडिया पोस्टमध्ये मोठी भरती जाहीर
इंडिया पोस्ट अर्थात भारतीय पोस्ट विभागामार्फत ग्रामीण डाक सेवक पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. नव्या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात या भरतीची अधिकृत माहिती समोर आली असून देशभरात 25 हजारांहून अधिक पदे भरली जाणार आहेत. या भरतीचे खास वैशिष्ट्य म्हणजे यासाठी कोणत्याही प्रकारची मुलाखत घेतली जाणार नाही.
advertisement
दहावी पाससाठी सरकारी नोकरीची संधी
या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. भारतीय पोस्ट ऑफिसने काही दिवसांपूर्वी याची अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवार किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. दहावी पास उमेदवारच या भरतीसाठी पात्र असतील.
अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती?
अर्ज प्रक्रिया 20 जानेवारी 2026 पासून सुरू झाली असून 4 फेब्रुवारी 2026 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. उमेदवारांची निवड थेट मेरिट लिस्टच्या आधारे केली जाणार आहे. दहावीच्या गुणांमध्ये विशेषतहा गणित विषयाच्या गुणांना प्राधान्य दिले जाणार आहे.
अर्ज शुल्क भरण्याची अंतिम मुदत 5 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 11 वाजेपर्यंत आहे. मेरिट लिस्ट 20 फेब्रुवारी 2026 रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. निवड झालेल्या उमेदवारांना सातव्या वेतन आयोगानुसार दरमहा 10 हजार ते 29,480 रुपये इतके वेतन मिळणार आहे.
