मुंबई पालिकेमध्ये महायुतीची सत्ता स्थापन झाल्यानंतर पहिला अर्थसंकल्प सादर केला गेला आहे. पण, पहिल्याच अर्थसंकल्पामध्ये मुंबईकरांवर नव्या कराचा बोजा पडणार आहे. महायुतीच्या पाणीपट्टी वाढ न करण्याची घोषणा कागदावरच राहणार आहे. पाणीपट्टीवाढ करणार नाही म्हणणाऱ्या महायुतीच्या पालिकेतील सत्ताकाळातच ५०० स्केअर फुटाखाली असणाऱ्या घरांना पाणीपट्टी आणि मलनीस्सारण कर आकारला जाणार आहे. ५०० स्केअर फुटाखालील घरांमध्ये जिथे जलमापक बसवलेले नाही तिथे पाणीपट्टी आणि मलनीस्सारण कर आकारणार जाणार आहे. यापूर्वी ५०० स्केअर फुटांखालील घरांना सरसकट मालमत्ता करासोबतच पाणीपट्टी आणि मलनीस्सारण कर माफ केला जात होता, आता मात्र तो आकारला जाण्याचे धोरण तयार केले जात आहे.
advertisement
विशेष म्हणजे, मागच्या वर्षी ७४,४२७ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. मागच्या वर्षीपेक्षा यंदा ६,५२५ कोटी रुपयांची वाढ झााली आहे. मधल्या काळात महापालिका निवडणुका झाल्या नसल्यानं ४ वर्षांनंतर नव्या सत्ताधाऱ्चांचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे.
मुंबई पालिकेच्या अर्थसंकल्पात काय केल्या घोषणा?
राज्य शासनाकडे बीएमसीचे एकूण १०,९४८.५८ कोटींची थकबाकी
मुंबई महापालिकेकडून ग्रीन बॉन्डस् वितरीत केले जाणार
मुंबईतील विवीध मोठे प्रकल्प, पायाभूत सुविधा यांकरता निधी उभारण्याकरता गुंतवणूकदारांना आकर्षित करणारे ग्रीन बॉन्डस देण्यात येणार
एकाच वेळी निर्गमीत केलेल्या १००० कोटींच्या बॉन्डस करता केंद्राकडून १०० कोटींचे अनुदान मिळणार
ठाकरे गटाच्या ठेवी महायुतीने तोडल्या, मुंबई महापालिका ठेवी मोडण्याचा तयारीत
एकूण ठेवी ८१ हजार ४४९ कोटी ३२ लाख रुपये शिल्लक
पैकी ४४ हजार ८२६ कोटी २३ लाख रुपये बांधील दैतवापोटी राखीव असल्यामुळे पालिकेला तोडता येणार नाहीत
मात्र उर्वरित ३६ हजार ६२३ कोटी ०९ लाख रुपये पालिका वेगवेगळ्या प्रकल्पासाठी वापरणार असल्याचं अर्थसंकल्पात स्पष्ट
पावसाळ्यात मोठे नाले, छोटे नाले व मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी महसुली अर्थसंकल्पात ९० कोटी, ८१ कोटी, ३८ कोटी इतकी तरतूद
पर्जन्य जल वाहिन्यांचा विविध कामांकरिता ०२५ - ०२६ च्या सुधारित भांडवली अर्थसंकल्पीय- १६०० कोटी
2०२६ -२७ च्या अर्थसंकल्पात १८०० कोटी तरतूद
मिठी नदीसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात २८६.२५ कोटींची तरतूद
मिठी नदीच्या रुंदीकरणाचे खोलीकरणाचे ९५ टक्के काम पूर्ण
संरक्षक भिंती बांधण्याचे ९४.६० टक्के काम पूर्णत्वास
मिठी नदीच्या विकास आणि प्रदूषण नियत्रणाच्या आराखड्याची अमलबजावणी चार पॅकेजेस मध्ये राबविली जाणार
यावर्षी ०२६ ०२७ साठी २८६.२५ कोटी इतकी तरतूद
- ऑक्टोबरपासून करमणूक कर लागू होणार
महाराष्ट्र शासनाकडून करमणूक शुल्कातून दिलेली सूट ३० सप्टेंबरपर्यंतच लागू
त्यानंतर महापालिका करमणूक कर वसूल करणार
महाराष्ट्र शासनाकडे याकरता महापालिकेनं शासनाकडे प्रस्ताव पाठवलाय
महायुती सरकारचं नवीन फेरीवाला धोरण
अनधिकृत बांगलादेशी फेरीवाल्यांविरोधात मोहीम हाती घेतलेली असताच आता अधिकृत फेरीवाल्यांना ओळखण्यासाठी QR code आधारित प्रमाणपत्र, यापुढे मुंबई महापालिका क्षेत्रातील अधिकृत फेरीवाल्यांना QR कोड आधारित प्रमाणपत्र दिलं जाणार,अनधिकृत फेरीवाल्यांच्या विरोधातली मोहीम तीव्र होणार
मुंबईकरांची पुलकोंडी सुटण्याची चिन्हं नाहीतच
मुंबई महानगर पालिकेने मुंबईतील तब्बल १०१ पूलांची बांधणी, दुरुस्तीची कामे हाती घेतली आहेत
यापैकी 24 कामे पूर्ण झाली
मार्च 2026 पर्यत 23 कामे पूर्ण होणार आहेत
2026-27 मध्ये 31 कामे पूर्ण करण्यात येतील
2028-29 मध्ये 23 पुलांची कामे मुंबई महानगर पालिका पूर्ण करणार आहे
त्यामुळे, पुढील ३ वर्षेतरी मुंबईकरांची पुलकोंडीतून सुटका नाही
नवीन पूल बांधणीसाठी पूल खात्यासाठी एकूण 9 हजार 650 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानाच्या माध्यमातून आतापर्यत 1.35 कोटी नागरिकांनी लाभ घेतला आहे. यामध्ये बदल करून आपला दवाखानाच्या माध्यमातून मधुमेह आणि नेत्ररोगाकरिता AI द्वारे मोफत उपचार केले जाणार आहे
भारतीय जनगणना 2027 ला दोन टप्यात केली जाणार पहिला टप्पा एप्रिल ते सप्टेंबर 2026 दुसरा टप्पा फेब्रुवारी 2027
ही जनगणना पूर्णतः डिजिटल स्वरूपात केली जाणार
2026-27 च्या अर्थसंकल्पात आरोग्य खात्यासाठी 5237 कोटी प्रस्तावित
मुंबईतील वाढत प्रदूषण पाहता पालिकेकडून पर्यावरण आणि स्वच्छतेसाठी भरीव तरतूद
अर्थसंकल्पमध्ये एकूण 159.82 कोटींची तरतूद
मुंबईच्या ट्रॅफीकवर कोट्यावधींच्या मल्टी-मॉडेल टनेल कनेक्टिव्हीटीचा उतारा
एक किमी करता ७३२ कोटी आणि एकूण ६ किमी करता ४३९२ कोटींचा मल्टी मॉडेल टनेल प्रकल्प
मुंबई महानगरपालिकेने वाढत्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून मल्टी-मॉडेल भूमिगत बोगद्यांचे जाळे प्रकल्प प्रस्तावित केला. बहुस्तरीय बोगद्यांचे जाळे विकसित केलं जाणार आहे. या बोगद्यांची आखणी एका स्तरावर वाहतूक आणि दुसऱ्या स्तरावर उपयुक्तता सेवा व मलनिःसारण प्रणाली अशाप्रकारे करण्यात आली आहे. यामुळे मुसळधार पावसाच्यावेळी मुंबईतील वाहतूकीची कोंडी टाळता येईल.
सदर कामाचा अंदाजित खर्च ६ कि.मी. करीता ₹४३९२ कोटी (प्रति कि.मी. अंदाजे १७३२ कोटी) इतका असून कंत्राट कालावधी ६६ महिने इतका आहे.
देवनार येथे कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प जुन 2026 पर्यत सुरु होणार
मुंबई महानगर पालिकेकडून मुंबईत प्लास्टिक आणि थर्माकोल बंदी असून 2025 या वर्षात महानगर पालिकेने एकूण 5962 किलो प्लास्टिक आजी थर्मकोल जप्त केला आहे
प्रजन्य जलवाहिनेच्या विकासाकरिता 1800 कोटीची तरतूद
मोठ्या इमारतीमधील आग विझवण्यासाठी 5 हाय राईज फायर फायटिंग वाहने खरेदी केली जाणार आहे
मुंबई अग्निशमन दलासाठी 230.90 कोटीची तरतूद
आपत्कालीन व्यवस्थापन खात्यासाठी 46.67 कोटीची तरतूद
माहिती तंत्रज्ञान खात्यासाठी 44.88 कोटीची तरतूद करण्यात आली आहे यामध्ये AI चा देखील समावेश आहे
-AI (कृत्रिम बुद्धीमत्ता) Coach - माहिती तंत्रज्ञान खात्यामार्फत भविष्यातील कृत्रिम बुद्धिमत्ता संचलित प्रणालीच्या दिशेने एक पाऊल म्हणून AI Coach उपक्रम सुरु करण्यात आला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध सेवांच्या ऑनलाईन अर्जासंबंधी नागरिकांना सुलभता प्रदान करण्याकरिता BMC Citizen AI Coach हा डिजिटल वॉकथूद्वारे मार्गदर्शन करेल.
तसंच, BMC Employee AI Coach विकसित करण्यात येणार असून त्याद्वारे कामाच्या स्वरुपानुसार, बृहन्मुंबई महानगरपालिकेतील वापरात असलेल्या विविध माहिती तंत्रज्ञानावर आधारीत प्रणालींचे स्वतः शिक्षण घेण्याकरिता व प्रणालींबाबतच्या समस्यांचे निवारण करण्यास मदत म्हणून कर्मचाऱ्यांची प्रत्यक्ष कार्यक्षमता वृद्धींगत करण्याच्या उद्देशाने डिजिटल वॉकथ्रूद्वारे मार्गदर्शन करेल.
पाण्याची मागणी आणि पुरवठ्यामधील तफावत दूर करण्यासाठी पाणीपुरवठ्यात वाढ
मनोर येथे प्रतिदिन 200 दशलक्ष लिटर क्षमतेचा निकषारीकरण प्रकल्प - 026-27 साठी 500 कोटींची तरतूद
मनोरी निकषाधिकरण प्रकल्पाते चारकोप व पुढे महावीर नगर कांदिवली दरम्यान उंदन केंद्र बोगद्याचे बांधकाम - 026 -027 साठी 270 कोटींची तरतूद
भांडुप संकुल येथे नवीन 2010 लिटर प्रति दिन क्षमतेचे शुद्ध पाणी उंदन केंद्र विकसित करण्यासाठी आरेखन बांधकाम आणि प्रचालन या तत्त्वावर स्थापत्य यांत्रिकी विद्युत उपकरणाची कामे - 026-027 साठी 250 कोटींची तरतूद
गुंदवली जल बोगद्याच्या उपकापासून वाईट जंक्शन जवळील दोन पर्यंत तीन हजार मिनी व्यासाच्या नवीन जलवाहिनीचा आराखडा व बांधकाम - 026-027 साठी 1100 कोटींची तरतूद
वर्सोवा येथे प्रतिदिन 200 दशलक्ष लिटर क्षमतेच्या निशारीकरण प्रकल्प - 0.25 कोटी तरतूद
नवीन तुळशी जलशुद्धीकरण केंद्र बांधण्याकरिता सल्लागाराची नियुक्ती - 0.50 कोटीची तरतूद
उदंचन केंद्र पिसे पांजरापूर येथे कार्यव्यवस्थापन प्रणाली कार्यान्वित - 26.75 कोटीची तरतूद
प्रगतीपथावरील कामे
गारगाई प्रकल्प - 437.51 कोटी
कुलाबा येथील मलजल प्रक्रिया केंद्र जलशुद्धीकरण प्रकल्प - 30 कोटीची तरतूद
हेडगेवार उद्यान(अमरमहल) ढवन उद्यान(वडाळा) जल बोगद्याचे बांधकाम (परेल) - 60 कोटीची तरतूद
हेडगेवार उद्यान ट्रॉम्बे निमस्तर जलाशय जल बोगदा बांधणे - 25 कोटींची तरतूद
येवई महासंतुलन जलाशय ते कशेळीदरम्यान जल बोगद्याचा आराखडा - 790 कोटींची तरतूद
कशेळी ते मुलुंड पर्यंत चल बोगद्याचे बांधकाम - 640 कोटींची तरतूद
घाटकोपर मूलचलप्रक्रिया सुविधा केंद्र धारावी मलजल प्रक्रिया सुविधा केंद्र पवई ते घाटकोपर जलाशया दरम्यान जल बोगद्याचे बांधकाम मांजरापूर इथं प्रतिदिन 910 दशलक्ष लिटर क्षमतेचा नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प भांडुप संकुल येथील विद्युत उपकरणाची कामे अशा विविध प्रकल्पांसाठी अर्थसंकल्पात तरतूद
पाणीपुरवठा प्रकल्प खात्यासाठी 2025 26 च्या अर्थसंकल्पीय अंदाज 4800 कोटी
2026 27 च्या अर्थसंकल्पी अंदाज 6,475 कोटींची तरतूद
मिठी नदीकरता २८६ कोटींची तरतूद
पर्जन्य जल वाहिन्या, पूर नियंत्रणाकरता १८०० कोटींची तरतूद
मुंबई महापालिका अग्निशमन दलाकरता २३० कोटींची तरतूद
मुंबईत बीएमसी सीटीझन एआय कोच उपक्रम सुरु करणार
या उपक्रमाद्वारे ऑनलाईन अर्जांसंबंधी डिजीटल वॉकथ्रुद्वारे मार्गदर्शन केले जाणार
मुंबईची चित्रनगरी म्हणून ओळख जपण्याकरता नवा प्रकल्प
मुंबई जागतिक पातळीवर ग्रीन फिल्मींग डेस्टीनेशन म्हणून उदयास येणार
याकरता १५ कोटी इतकी तरतुद
मुंबईची राणीबागेचं नवीन आकर्षण
राणीबागेत टनेल मत्स्यालय, एक्झॉटीक झु तयार करणार
दोन मजली अफ्रीकन थीम असलेले चित्ता उपहार गृह प्रस्तावित
राणीबागेसाठी १३६ कोटींची तरतूद
मुंबईतील हायमास्ट दिव्यांकरता ३२३ कोटींची तरतूद
मुंबईतील काळाघोडा परिसराच्या कलात्मक, ऐतिहासिक ओळखीसाठी नवी पॉलिसी
काळा घोडा परिसरात पादचारी प्लाझा तयार करण्यात येईल
संपूर्ण परिसर विशिष्ट कालावधीकरता केवळ पादचा-यांकरता उपलब्ध होणार
सर्व उपहारगृह, दुकानांचे फलक एकसमान ठेवण्याबाबत धोरण करणार
वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयासाठी १३६.७० कोटींची तरतूद
वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयाचे आधुनिकीकरण, विस्तार,विदेशी पक्षी प्रदर्शनी, दुर्मिळ रंगीबेरंगी पक्षांचे प्रदर्शन करण्यात येणार
येणाऱ्या काळात पक्षांसाठी स्वतंत्र रुग्णालय,स्वयंपाकघर, अंतर्गत सेवा रस्ते, पायाभूत सुविधा प्रस्तावित
सर्व कामे ०२७ पर्यंत पूर्ण होणार असल्याचे अपेक्षित
०२५ ते ०२६ मध्ये ४४.३१ कोटी तर ०२६ -०२७ मध्ये १३६.७० कोटींची तरतूद
मुंबईच्या पाणीपुरवठा प्रकल्पातील तरतुदी
मुंबईकरांची तहान भागवण्याकरता भरीव तरतुदी
मुंबईला दररोज अतिरीक्त २०० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा करणारा मनोरी प्रकल्प - ५०० कोटींची तरतूद
एकूण ६४७५ कोटींची तरतूद
