गुंतवणूकदारांकडून पैसे घेतले मात्र...
गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना मागील वर्षीची होती. मात्र, तक्रारदाराने आता तक्रार दिल्याने अटक करण्यात आली आहे. या दोन्ही विकासकांनी गुंतवणूकदारांकडून पैसे घेतले, मात्र प्रकल्प पूर्ण केला नाही. जेव्हा गुंतवणूकदारांनी परतफेड मागितली, तेव्हा विकासकांनी डी.के. रावला मध्ये टाकून दडपशाही करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप त्याच्यावर केला गेला आहे.
advertisement
कोण आहे डी.के. राव?
धारावीचा रहिवासी असलेला डी.के. राव हा 1990 च्या दशकात किरकोळ चोरी आणि लूटमार करत होता. त्यानंतर तो गुन्हेगारी क्षेत्रात उतरला. त्यानंतर त्याचा संबंध छोटा राजन टोळीशी आला आणि त्याने अंडरवर्ल्डमध्ये पाय ठेवला. 1990 ते 2000 या काळात मुंबईतील जबरदस्ती, खंडणी, आणि मालमत्तेवरील वादांमध्ये डी.के. रावचे नाव वारंवार समोर आले. नंतर त्याने स्वतःचे स्वतंत्र नेटवर्क तयार केले, परंतु छोटा राजनप्रती निष्ठा कायम ठेवली. पोलिस नोंदीनुसार, त्याच्यावर 42 गुन्हे दाखल आहेत, ज्यात सहा खून, पाच दरोडे, आणि अनेक खंडणीचे गुन्हे समाविष्ट आहेत.
डी. के. रावला पुन्हा अटक
डी. के. रावला यावर्षी जानेवारी महिन्यातही अटक करण्यात आली होती. त्याने अंधेरीतील एका हॉटेल व्यवसायिकाला धमकावून कमी किंमतीत मालमत्ता विकण्यास भाग पाडले होते. त्या प्रकरणात त्याला एप्रिल महिन्यात सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. त्यानंतर आता त्याला पुन्हा अटक करण्यात आली आहे. डी.के. रावसारखे जुने गुंड अजूनही रिअल इस्टेट आणि बांधकाम व्यवसायातील वादांमध्ये धमकावण्याची कामं करतात.