TRENDING:

Danish Chikna Arrested : गँगस्टर दाऊद इब्राहिमवर NCB चा स्ट्राईक! हस्तक दानिश चिकनाला गोव्यातून अटक

Last Updated:

Danish Chikna Arrested In Goa : दानिश मर्चंट आणि त्याच्या साथीदारावर मुंबईतील डोंगरी परिसरात दाऊद इब्राहिमसाठी ड्रग्ज फॅक्टरी चालवल्याचा गंभीर आरोप आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Dawood Ibrahim Drug Factory Manager Danish Chikna : गँगस्टर दाऊद इब्राहिमचा प्रमुख सहकारी म्हणून ओळखला जाणारा आणि दानिश चिकना या नावाने कुख्यात असलेला दानिश मर्चंट याला पुन्हा एकदा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो म्हणजेच एनसीबीने ताब्यात घेतले आहे. दानिश मर्चंट ड्रग्जशी संबंधित आरोपांवरून अटक होण्याची ही पहिली वेळ नाही. त्याला यापूर्वी डिसेंबर 2024 मध्ये मुंबई पोलिसांनी ड्रग्ज प्रकरणात अटक केली होती. त्यावेळी त्याचा सहकारी कादर गुलाम शेख याच्यासह त्याला ताब्यात घेण्यात आले होते.
Dawood Ibrahim Drug Factory Manager Danish Chikna Arrested
Dawood Ibrahim Drug Factory Manager Danish Chikna Arrested
advertisement

दाऊद इब्राहिमसाठी ड्रग्ज फॅक्टरी

मर्चंट आणि त्याच्या साथीदारावर मुंबईतील डोंगरी परिसरात दाऊद इब्राहिमसाठी ड्रग्ज फॅक्टरी चालवल्याचा गंभीर आरोप आहे. नोव्हेंबर 2024 मध्ये मोहम्मद आशिकुर सहिदुर रहमान आणि रेहान शकील अन्सारी यांच्या अटकेतून दानिशचे कनेक्शन उघडकीस आले होते, ज्यानंतर मुंबई पोलिसांनी काही महिन्यांच्या तपासानंतर त्याला अटक केली होती. जामिनावर सुटल्यानंतरही दानिशवर पोलिसांची नजर होती.

advertisement

दाऊदच्या ड्रग्ज नेटवर्कवर मोठा प्रहार

दानिश मर्चंट हा एनसीबीच्याही रडारवर होता. अन्सारी आणि शेखच्या मागावर असलेल्या एनसीबीला याच तपासातून दानिश मर्चंटपर्यंत पोहोचला आले. दानिश चिकनाची ओळख एमडी ड्रगचा मुख्य पुरवठादार म्हणूनही आहे. 2021 मध्येही एनसीबीने दाऊदशी संबंधित एका वेगळ्या ड्रग्ज फॅक्टरी ऑपरेशनच्या संदर्भात त्याला राजस्थानहून मुंबईत आणले होते. यानंतर डिसेंबर 2024 मध्ये मुंबई पोलिसांनी त्याला अटक केली होती आणि आता पुन्हा एकदा एनसीबीने त्याला ताब्यात घेतले आहे, ज्यामुळे दाऊदच्या ड्रग्ज नेटवर्कवर मोठा प्रहार होण्याची शक्यता आहे.

advertisement

आंतरराष्ट्रीय ड्रग्ज सिंडिकेटला धक्का

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सांधेदुखी होईल कमी, जेवणात समावेश करा कडीपत्ता आणि तिळाची चटणी, रेसिपीचा Video
सर्व पहा

दरम्यान, पोलिसांच्या माहितीनुसार, मागील वर्षी या प्रकरणात अटक झालेल्या आरोपींकडून 144 ग्रॅम आणि 55 ग्रॅम असे एकूण 199 ग्रॅम अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. या साठ्याच्या मुख्य पुरवठ्यासाठी दानिश चिकना जबाबदार होता. या अटकेनंतर दाऊदच्या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज सिंडिकेटची काही महत्त्वाची माहिती एनसीबीच्या हाती लागण्याची शक्यता आहे.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
Danish Chikna Arrested : गँगस्टर दाऊद इब्राहिमवर NCB चा स्ट्राईक! हस्तक दानिश चिकनाला गोव्यातून अटक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल