रुग्णालयाच्या ICU विभागात व्हेंटिलेटरवर उपचार घेत असलेल्या 89 वर्षीय सुहासिनी माठेकर यांचा आज मृत्यू झाला आहे. रूग्णालय प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे एका निष्पाप वृद्ध महिलेला जीव गमवावा लागल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. 89 वर्षीय वृद्ध महिला गेल्या काही दिवसांपासून सतत आजारी होत्या. पण 12 मार्चला त्यांची अचानक तब्येत बिघडल्यामुळे त्यांच्या नातेवाईकांना मीरा भाईंदर महापालिकेच्या पंडीत भीमसेन जोशी रूग्णालयामध्ये दाखल केले. वृद्ध महिलेची तब्येत ढासळत चालल्यामुळे रुग्णालयाने त्यांना अतिदक्षता विभागामध्ये (ICU) व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.
advertisement
मात्र रविवारी रात्री वृद्ध महिलेचा हात उंदराने कुरतडला. त्यामुळे रूग्णालय प्रशासनाचे आयसीयुमध्ये असलेल्या रुग्णांकडे दुर्लक्ष केले जाते, असा आरोप पेशंटच्या नातेवाईकांनी रूग्णालय प्रशासनावर केला आहे. ही बाब निदर्शनात आल्यानंतर सर्वच स्तरातून महापालिकेच्या रूग्णालयावर नागरिकांकडून टीका केली जात आहे. रविवारी (15 मार्च) रात्री उंदराने सुहासिनी यांच्या हाताला कुरतडलं. जेव्हा सकाळी सहा वाजेच्या सुमारास त्यांना त्यांचे नातेवाईक भेटण्यासाठी आले, त्यावेळी उंदराने त्यांच्या हाताला कुरतडल्याचा प्रकार उघडकीस आला. घडलेला प्रकार पेशंटच्या नातेवाईकांना कळल्यानंतर पेशंटच्या नातेवाईकांनी शिफ्टमध्ये असणाऱ्या डॉक्टर आणि नर्स यांच्या ही विशेष गोष्ट कशी काय लक्षात नाही आली? असा प्रश्न उपस्थित केला.
इतकंच नाही तर, पेशंटच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाच्या निष्काळजीपणा वर काही गंभीर प्रश्न सुद्धा उपस्थित केले आहेत. पेशंटला उंदराने कुरतडणं ही बाब काही नवीन नाही, यापूर्वीही अनेकदा उंदराने पेशंटला कुरतडलंय. या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता केली जात आहे. दरम्यान, यापूर्वीही अशाच घटना समोर आल्या होत्या.
