TRENDING:

Panvel Crime : धक्कादायक! गुगलवर हॉस्पिटलचा नंबर शोधणं पडलं महागात; नेमकं घडलं काय?

Last Updated:

Panvel News : पनवेलमधील कळंबोली शहरात राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची बनावट रुग्णालयाच्या वेबसाइटद्वारे एक भयंकर गुन्हाची नोंद झालेली असून पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
Choose
News18 on Google
advertisement
नवी मुंबई : एक छोटी चूक व्यक्तीला किती महागात प़डू शकते हेच या घटनेने समोर आलेली आहे. पनवेल शहरात नेमके काय घडले आणि प्रकरण कशा प्रकार समोर आले त्याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
News18
News18
advertisement

नेमकं घडले काय?

पनवेलमध्ये रुग्णालयाच्या नावाने ऑनलाइन फसवणुकीची धक्कादायक घटना समोर आली आहे. कळंबोली येथील सेक्टर 1 मधील सोसायटीत राहणाऱ्या 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकांची तब्बल 6 लाख 40 हजार रुपयांची फसवणूक झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उपचारासाठी त्यांनी कर्नाटकातील नागरमोळी येथील एका प्रसिद्ध आयुर्वेद रुग्णालयाची माहिती इंटरनेटवर शोधली. शोधताना त्यांना अधिकृत संकेतस्थळासारखे दिसणारे एक बनावट वेबसाइट आढळले. त्या वेबसाइटवरील संपर्क क्रमांकावर फोन केल्यानंतर दोन संशयित व्यक्तींनी त्यांच्याशी संवाद साधला.

advertisement

लिंक डाउनलोड करताच बँक खात्यावर डल्ला

संशयितांनी विश्वास संपादन करून ज्येष्ठांच्या मोबाईलवर 'डॉट एपीके' फाइल पाठवली आणि ती डाउनलोड करण्यास सांगितले. फाइल डाउनलोड केल्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून टप्प्याटप्प्याने 6 लाख 40 हजार रुपये दुसऱ्या खात्यात वळवण्यात आले.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
150 रुपयांना खरेदी करा अन् 300 ला विका, पिंपरीत ट्रेंडी कुर्तींचं होलसेल मार्केट
सर्व पहा

काही वेळाने रुग्णालयाशी थेट संपर्क साधल्यावर कोणतीही रक्कम मिळाली नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संबंधित ज्येष्ठ नागरिकांनी तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली.या घटनेमुळे ऑनलाइन व्यवहार करताना अधिकृत संकेतस्थळ आणि अॅपची खातरजमा करणे किती महत्त्वाचे आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
Panvel Crime : धक्कादायक! गुगलवर हॉस्पिटलचा नंबर शोधणं पडलं महागात; नेमकं घडलं काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल