TRENDING:

Mumbai : सिगारेटवरून बाचाबाची, टपरीवाल्याला 1 किमी फरफटत नेलं, मुंबईतला धक्कादायक Video

Last Updated:

सिगारेट विक्रेत्याला मारहाण करून कारमधून सुमारे 1 किमी फरफटत नेल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईमध्ये घडला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
संकेत वरक, प्रतिनिधी
सिगारेटवरून बाचाबाची, टपरीवाल्याला 1 किमी फरफटत नेलं, मुंबईतला धक्कादायक Video
सिगारेटवरून बाचाबाची, टपरीवाल्याला 1 किमी फरफटत नेलं, मुंबईतला धक्कादायक Video
advertisement

मुंबई : सिगारेट विक्रेत्याला मारहाण करून कारमधून सुमारे 1 किमी फरफटत नेल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईमध्ये घडला आहे. मुंबईमधील अंधेरी पश्चिम भागातील ओशिवारा परिसरात घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ माजली आहे. मेगा मॉलजवळ असलेल्या सिगारेट विक्रेत्याला आरोपींनी त्यांच्या वॅगनआर कारमधून फरफटत नेलं आहे. या वॅगनआर कारमधून महिलांसह आरोपीने एन्ट्री केली. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेजही समोर आला आहे.

advertisement

सिगारेट खरेदीच्या बहाण्याने वाद घालत आरोपी आणि सिगारेट विक्रेता यांच्यात बाचाबाची झाली, त्यानंतर आरोपीने हल्ला केला. आरोपीने सिगारेट विक्रेत्याच्या चेहऱ्यावर ठोसे मारत विक्रेत्याला जबरदस्ती कारमध्ये ओढलं आणि चालत्या कारमधून फरफटत नेलं.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
द्राक्षाच्या दरात मोठी उलथापालथ, केळी भाव घसरले, कांद्याची काय स्थिती?
सर्व पहा

एसीपी कार्यालयाजवळच ही घटना घडल्यामुळे सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. सिगारेट विक्रेत्याला एक किमी फरफटत नेल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai : सिगारेटवरून बाचाबाची, टपरीवाल्याला 1 किमी फरफटत नेलं, मुंबईतला धक्कादायक Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल