घटनेबाबत अधिक माहिती अशी की जयपूर -मुंबई एक्स्प्रेसमध्ये गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दहिसर ते मीरारोडदरम्यान ही घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. आज पहाटे साडेपाच वाजेच्यादरम्यान ही घटना घडली आहे. गोळीबाराचं कारण अद्याप अपष्ट आहे. या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका पोलिसाचा देखील समावेश आहे.
advertisement
घटनेनं खळबळ
रेल्वेत गोळीबार झाल्यानं खळबळ उडाली आहे. या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला आहे, मृतांमध्ये एका पोलिसाचा देखील समावेश आहे. गोळीबाराचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये तणावाचं वातावरण आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jul 31, 2023 8:13 AM IST
