TRENDING:

ठाण्याच्या वाहतूक कोंडीतून सुटका, घणसोली-ऐरोली खाडीवर मोठा प्रकल्प, डेडलाईन ठरली

Last Updated:

Navi Mumbai Road Project : घणसोली ते ऐरोली दरम्यान उभारला जाणारा रोड प्रकल्प वेगाने सुरू आहे. सुमारे 550 कोटींच्या या प्रकल्पामुळे ठाणे-बेलापूर मार्गावरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
Choose
News18 on Google
advertisement
नवी मुंबई : नवी मुंबई शहरात अनेक विकास कामे सुरु आहेत. सर्व सुरु असलेल्या प्रकल्पाचा मुळ उद्देश वाहतूक कोंडी कमी करणे आणि नागरिकांना चांगली वाहतूक सुविधा मिळणे, त्यात सध्या नवी मुंबईतील वाहतूककोंडी कमी करण्यासाठी एका प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आलेले आहे. नेमका तो मार्ग कोणता आणि नवी मुंबईतील कोणत्या भागांना त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल ते पाहूयात.
Ghansoli to Airoli 6 lane road project update 2026
Ghansoli to Airoli 6 lane road project update 2026
advertisement

वाहतूक कोंडीतून मिळणार सुटका

नवी मुंबईत वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी घणसोली ते ऐरोली दरम्यान नवीन रस्त्याचे काम वेगाने सुरू आहे. हा प्रकल्प 2027 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. सुमारे 550 कोटी रुपये खर्चून हा साडेतीन किलोमीटर लांबीचा आणि सहा मार्गिकांचा रस्ता तयार केला जात आहे. या कामासाठी नवी मुंबई महानगर पालिका आणि सिडको समसमान निधी देत आहेत.

advertisement

कोणत्या भागांना होणार फायदा?

या नव्या मार्गामुळे ठाणे-बेलापूर रस्त्यावरील घणसोली महापे ते ठाणे आणि घणसोली महापे ते मुलुंड या मार्गांवरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. सध्या ठाणे-बेलापूर आणि शीव-पनवेल हे मार्ग खूप व्यस्त आहेत. नाशिक, मुंबई, मीरा-भाईंदर आणि गुजरातकडून ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दिवसा हलकी वाहने आणि रात्री जड वाहनांमुळे या रस्त्यांवर सतत वाहतूक सुरू असते.

advertisement

याशिवाय नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर आणि कार्गो सेवा वाढल्यानंतर वाहतूक आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा नवीन पाम बीच रोड विस्तार आणि खाडीपूल प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
रमजानमध्ये दिली जाते जकात, काय आहे या मागील प्रथा आणि महत्त्व? Video
सर्व पहा

सध्या या प्रकल्पाचे फाउंडेशन आणि बोर पाइलिंगचे काम सुरू असून काही ठिकाणी प्रत्यक्ष बांधकामही सुरू झाले आहे. हा पूल नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील चौथा खाडीपूल असणार आहे.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
ठाण्याच्या वाहतूक कोंडीतून सुटका, घणसोली-ऐरोली खाडीवर मोठा प्रकल्प, डेडलाईन ठरली
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल