एक्स्प्रेसवे वर टोल स्वरूपात सरकार जनतेकडून अमाप पैसा वसूल करतो. तरीही देखील जनतेला कोणतीच सुविधा पुरवली जात नाही. तसेच द्रुतगतीवर वाहनांची संख्या वाढली तर उपाययोजना करण्याची गरज असताना IRB टोल वसूल करण्यात गुंतले आहेत. तर यावर तोडगा काढण्यासाठी महामार्ग पोलीसांनी 15- 15 मिनिटांचे ब्लॉक घेतले परंतु त्यामुळे पुण्यावरून मुंबईला जाणारी लेनवर ही भयंकर वाहतूक कोंडी असल्याचं चित्रं दिसून येत आहे. 26 जानेवारी (प्रजासत्ताक दिन) आणि जोडून आलेल्या शनिवार-रविवारच्या सुट्ट्यांमुळे नागरिक मोठ्या संख्येने पुण्याकडे आणि लोणावळा- महाबळेश्वरकडे पर्यटनासाठी बाहेर पडले आहेत.
advertisement
यामुळे मुंबई- पुणे यशवंतराव चव्हाण एक्स्प्रेसवेवर वाहनांचा ओघ प्रचंड वाढला असून खंडाळा घाटात 4 ते 5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. विशेषतः अमृतांजन पुलाजवळ आणि घाट परिसरात वाहतूक संथ गतीने सुरू आहे. दरम्यान, वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महामार्ग पोलीस आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी तैनात आहे. काही ठिकाणी 'ब्लॉक' देऊन वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्रवाशांनी संयम राखावा आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन महामार्ग पोलिसांकडून करण्यात आले आहे.
