प्रशासनाने निर्णय घेतला का?
एलफिन्स्टन उड्डाणपूल आणि सायन रेल्वे पूल यांच्या पुनर्बांधणीचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. ही समस्या कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
बंदी नेमकी किती काळासाठी लागू असणार आहे?
नवीन नियम आजपासून लागू झाले असून 12 मे 2026 पर्यंत ते लागू राहतील. पुढील तीन महिन्यांसाठी टिळक पुलावरून अवजड वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही शिवाय नियमांनुसार सकाळी 7 ते रात्री 11 या वेळेत ट्रॅव्हल्स बस, काँक्रीट मिक्सर, डंपर, ट्रेलर तसेच इतर जड वाहनांना पुलावरून जाण्यास मनाई करण्यात आली आहे. या काळात केवळ हलक्या वाहनांना आणि अत्यावश्यक सेवांना परवानगी असेल.
advertisement
मुंबईत सुरू असलेल्या पायाभूत कामांमुळे अनेक ठिकाणी वाहतूक व्यवस्थेवर ताण येत आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
पर्यायी मार्गाची माहिती
1) मुलुंड, मानखुर्द, नवी मुंबई तसेच मुंबईबाहेरून येणारी अवजड वाहने बी.ए. रोड आणि दादर पूर्व दक्षिण वाहिनीमार्गे टिळक उड्डाण पुलाकडे येत असतील तर त्यांनी पुलावर न जाता पर्यायी मार्गाचा वापर करावा. ही वाहने दादर टी.टी. जंक्शन -ब्रॉडवे जंक्शन- कोहिनूर जंक्शन - शिंदेवाडी -हिंदमाता - बीआयटी परेल वर्कशॉप (कृष्णानगर) - लालबाग ब्रिज स्लिप - भारतमाता सिग्नल- गरमखाडा सिग्नल (उजवे वळण) - चिंचपोकळी ब्रिज या मार्गे पुढे इच्छित स्थळी जाऊ शकतात.
2) बी.ए. रोडच्या उत्तर वाहिनीवरून टिळक उड्डाण पुलाकडे येणाऱ्या अवजड वाहनांनी दादर टी.टी. सर्कलवरून सरळ बी.ए. रोडने पुढे जावे. त्यानंतर महेश्वरी सर्कल - अरोरा जंक्शन - सायन हॉस्पिटल जंक्शन (डावे वळण) - सुलोचना शेट्टी मार्ग - कुंभारवाडा जंक्शन (डावे वळण)- कटारिया रोड - कटारिया ब्रिज - शोभा हॉटेल जंक्शन - आसावरी जंक्शन - वीर सावरकर रोड (डावे वळण) - शिवाजी पार्क- सिद्धिविनायक मंदिर जंक्शन - आप्पासाहेब मराठे चौक- बाबासाहेब चैत्यभूमी सिग्नल - सूर्यवंशी हॉल वळण - लेनिन ग्राड (उजवे वळण)- वरळीकर चौक या मार्गे पुढे जावे.
3) सेनाभवन, एल.जे. रोड परिसरातून येणारी वाहने शोभा हॉटेल जंक्शनवर उजवे वळण घेऊन कटारिया रोडमार्गे कुंभारवाडा जंक्शनकडे जाऊ शकतात. तेथून सुलोचना शेट्टी मार्गाने सायन हॉस्पिटलच्या दिशेने जाता येईल
