10वी- 12च्या परीक्षेसाठी फॉर्म 17 भरणार्या विद्यार्थ्यांना दिलासा...
जुलै महिन्यामध्ये अनेकांचे जॉब गेले आहेत. जॉब गेल्यामुळे त्यांच्यावर बेरोजगारीची टांगती तलवार आहे. अनेक क्षेत्रांतील कर्मचारी जॉब गेल्यामुळे नवीन जॉबची संधी शोध देत आहेत. तर, दुसरीकडे डेटा ॲनालिटिक्स, एआय, क्लाउड टेक्नोलॉजी, सायबर सेक्युरिटी सारख्या इंडस्ट्रीमध्ये नोकरीसाठी उमेदवारंच नाहीयेत. तिकडे उमेदवारांचा तुटवडा आहे. असं आम्ही बोलत नाहीये, तर अशी माहिती काही रिपोर्ट देत आहेत. 'टीमलीज डिजिटल' आणि 'इंडिड' या दोन्हीही संस्थांकडून काही आलेल्या रिपोर्टने सर्वांचीच डोळे उघडले आहेत. तुम्ही आम्ही घेतलेल्या शिक्षणाचा सध्या उपलब्ध असलेल्या नोकऱ्यांमध्ये कोणताही फायदा नाही, असंच दिसत आहे. आता आयटी संबंधित क्षेत्रातील प्रत्येक व्यक्तीला आयटी संबंधित नवीन अभ्यासक्रमाची गरज आहे.
advertisement
साबुदाण्यापासून तयार केला बाप्पा, छ. संभाजीनगरमधील 14 फुट मूर्ती ठरतेय आकर्षण
'टीमलीज डिजिटल'ने दिलेल्या माहितीनुसार, एआय आणि जनरेटिव्ह एआयमध्ये 10 पदांसाठी फक्त एकच उमेदवार पात्र आहे. त्यामुळे संबंधित उमेदवारांनी आयटी संबंधित शिक्षण घेण्याची सध्या काळाची गरज आहे. 2026 पर्यंत तब्बल 53% मनुष्यबळाची कमतरता जाणवणार असल्याची माहिती रिपोर्टमध्ये दिली आहे. तर, 'इंडीड'च्या आकडेवारीनुसार, नोकरी जाहिरातींमध्ये मोठ्या प्रमाणावर घट झाली असून, सॉफ्टवेअर क्षेत्रात कायमच नोकरीच्या संधी वाढताना दिसत आल्या आहेत. डेटा ॲनालिटिक्समध्ये 15.4%, लॉजिस्टिक्समध्ये 14.3% आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये 9.2% वाढ झाली आहे, तर मेडिकल, फार्मसी आणि शिक्षण क्षेत्रातील नोकरीच्या जाहिरातींत घट दिसून आल्याचे समोर आले आहे.
नाळ तुटलेली नाही! पुणेकर दाम्पत्याने केली आयर्लंडमध्ये बाप्पांची प्राणप्रतिष्ठा
नोकर्यांच्या जाहिरातींमध्ये पगाराची माहिती देण्याचे प्रमाण कमी झाले असून जुलै 2025 पासून केवळ 45% जाहिरातींमध्येच पगाराची माहिती देण्यात आली होती. 'कौशल्य-कमतरते'वर तोडगा काढण्यासाठी शिक्षण आणि उद्योग यांच्यात समन्वय वाढवणे आवश्यक आहे. नवीन अभ्यासक्रम तयार करणे, विद्यार्थ्यांना डिजिटल कौशल्ये शिकवणे, कर्मचाऱ्यांसाठी सतत प्रशिक्षण कार्यक्रम राबवणे हे महत्त्वाचे उपाय आहेत.