शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि मंत्री प्रताप सरनाईक यांचे सुपुत्र विहंग सरनाईक गेल्या दोन वर्षापासून प्रो गोविंदा लीगचे आयोजने वरळी डोम येथे करत असतात. यंदाच्या वर्षी देखील या लीगचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे मुंबईतील सर्व महत्वाच्या आणि नावाजेलेल्या दहीहंडी पथकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. यामध्ये जोगेश्वरीतील सर्वांत प्रसिद्ध पथक जय जवानने देखील नोंदणी केली होती. पण अचानक आता त्यांना स्पर्धेतून बाहेर करण्यात आले आहे.
advertisement
लीगमधून बाहेर का काढलं?
प्रो गोविंदा लीगमध्ये फक्त 32 पथकांनाच संधी दिली जाते. विशेष म्हणजे जे पथक आधी नोंदणी करतात त्यांना पहिल्या प्राधान्याने संधी दिली गेली आहे. या लीगमध्ये जय जवान पथकाची नोंदणी असून देखील त्यांना संधी देण्यात आली नाही आहे. कारण जय जवान पथकाने नोंदणी करण्यास उशीर केल्यामुळे त्यांना यंदाच्या लीगमध्ये संधी देण्यात आली नसल्याचे कारण आयोजकांनी सांगितले आहे. जय जवान सोबत मागच्या वर्षी उपविजेते ठरलेल्या पथकालाही अंतिम 32 पथकामध्ये संधी देण्यात आली नाही आहे. त्याच्याबाबत उशिरा नोंदणी केल्याचा प्रकार घडला आहे.
जय जवान गोविंदा पथकाच्या मते त्यांनी 12 वाजून 4 मिनिटांनी नोंदणी केली होती. त्यांच्यासोबत खोपटचा राज आणि नूतन बालवाडी गोविंदा पथकाने देखील 12 वाजून 4 मिनिटांनी नोंदणी केली होती. पण आयोजकांच्या मते काही सेकंदामुळे जय जवान मागे राहिले त्यामुळे त्यांना अंतिम 32 पथकामध्ये स्थान मिळालं नाही, असे जय जवान गोविंदा पथकाचे अध्यक्ष संदीप धावडे यांनी सांगितले आहे. तसेच आयोजकांनी राजकारण करुन आम्हाला बाहेर काढल्याचा जय जवान पथकाचा आरोप आहे.
दरम्यान जरी आयोजक उशिरा नोंदणीच कारण देत असले तरी वरळी डोमच्या एका कार्यक्रमात जय जवान पथकाने ठाकरे बंधूंना सलामी दिली होती.या सलामीमुळेच जय जवान पथकाला प्रो गोविंदा लीगमध्ये संधी न दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे या लीगवरून राजकारण तापण्याची शक्यता आहे.