TRENDING:

पती नव्हे पत्नी निघाली 'तळीराम'; नशेत झिंगलेल्या बायकोने घरात केला क्रूर प्रकार, मुंबई पोलिसांचं डोकं सुन्न

Last Updated:

पत्नीच्या सततच्या मद्यपानाच्या सवयीमुळे त्रस्त असलेल्या मोहम्मद यांनी तिला तू रोज दारू का पितेस? असा जाब विचारला होता.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
संकेत वरक, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

मुंबई: जोगेश्वरी पश्चिम परिसरातून एक थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. किरकोळ वादाचे रूपांतर हिंसक संघर्षात होऊन एका पत्नीने आपल्या पतीवर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी अंबोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून परिसरात या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 31 मार्च 2026 रोजी रात्री 10 च्या सुमारास ही घटना घडली. तक्रारदार मोहम्मद रफीक कुरेशी (39 वर्षे) हे व्यवसायाने प्लंबर आहेत. आपले काम संपवून घरी परतले होते. घरी आल्यावर त्यांना त्यांची पत्नी, सबा कुरेशी (30 वर्षे) मद्यधुंद अवस्थेत झोपलेली आढळली. पत्नीच्या सततच्या मद्यपानाच्या सवयीमुळे त्रस्त असलेल्या मोहम्मद यांनी तिला तू रोज दारू का पितेस? असा जाब विचारला  यावरून पती-पत्नीमध्ये मोठा वाद झाला.

advertisement

चाकूने केले वार 

सुरुवातीला केवळ शिवीगाळीपर्यंत मर्यादित असलेला हा वाद काही वेळातच विकोपाला गेला. सबा कुरेशी हिने रागाच्या भरात पतीला घराबाहेर जाण्याची धमकी दिली. मोहम्मद यांनी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला आणि शिवीगाळ न करण्याबाबत समज दिली. मात्र, दारूच्या नशेत असलेल्या सबाचा संयम सुटला. तिने रागाच्या भरात घरातील भाजी कापण्याचा तीक्ष्ण चाकू उचलला आणि मोहम्मद यांच्यावर वार केले.

advertisement

नवऱ्याच्या उजव्या पायाला आणि डाव्या हाताला गंभीर जखमा

या अनपेक्षित हल्ल्यात मोहम्मद यांच्या उजव्या पायाला आणि डाव्या हाताला गंभीर जखमा झाल्या. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मोहम्मद यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर मोहम्मद रफीक कुरेशी यांच्या तक्रारीवरून अंबोली पोलिसांनी पत्नी सबा कुरेशी विरोधात विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. कौटुंबिक हिंसाचार आणि धारदार शस्त्राने दुखापत केल्याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

advertisement

वाढत्या घरगुती हिंसाचाराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर 

घरातील छोटी भांडणे जेव्हा हिंसक वळण घेतात, तेव्हा त्याचे परिणाम संपूर्ण कुटुंबाला भोगावे लागतात. व्यसनाधीनता ही कौटुंबिक सुखात कशी विष कालवू शकते, याचे हे जिवंत उदाहरण आहे. जोगेश्वरीतील या घटनेने वाढत्या घरगुती हिंसाचाराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.

advertisement

हे ही वाचा :

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
उन्हाळ्यात शरीराला फायदेशीर, बनवा खास बडीशोपचे सरबत, रेसिपीचा संपूर्ण Video
सर्व पहा

निर्जन ठिकाणी बोलावलं, डोळ्यात चटणी टाकली अन्..., छ. संभाजीनगरच्या ‘त्या’ तरुणांचा डाव फसला, दोघे अटकेत 

मराठी बातम्या/मुंबई/
पती नव्हे पत्नी निघाली 'तळीराम'; नशेत झिंगलेल्या बायकोने घरात केला क्रूर प्रकार, मुंबई पोलिसांचं डोकं सुन्न
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल