TRENDING:

रक्तातली साखरेची पातळी चुकूनही वाढणार नाही, फक्त दररोज चघळा ही हिरवी पाने, VIDEO

Last Updated:

आहारतज्ज्ञ प्रणाली बोबडे यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, विशेषतः मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी ही पाने उपयुक्त आहेत. कारण, त्यांचे नियमित सेवन रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
प्रियांका जगताप, प्रतिनिधी
advertisement

मुंबई - कढीपत्ता ही सामान्यतः फोडणीत वापरली जाणारी पाने आहेत. हा मसाल्यांच्या पदार्थामध्ये येत असून ही एक आयुर्वेदिक वनस्पती आहे. याच्या पानांमध्ये (ॲंटिऑक्सिडन्ट), ॲंटि-डायबेटिक ॲंटिमायक्रोबियल, ॲंन्टि-इन्फ्लेमेटरी हे सर्व गुणधर्म आढळून येतात. याचा उपयोग अनेक रामबाण म्हणून केला जातो. त्यामुळे या कढीपत्त्याचे अनेक गुणकारी उपयोग नेमके काय आहेत, हे जाणून घेऊयात.

advertisement

आहारतज्ज्ञ प्रणाली बोबडे यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, विशेषतः मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी ही पाने उपयुक्त आहेत. कारण, त्यांचे नियमित सेवन रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते. त्यामुळे कढीपत्त्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घेणे अत्यावश्यक आहे.

रक्तातील साखर नियंत्रणासाठी महत्त्व:

कढीपत्त्याचे नियमित सेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. यातील अँटी-डायबेटिक गुणधर्म रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.

advertisement

पचन सुधारण्यासाठी लाभदायक:

कढीपत्त्याचे सेवन पाचनशक्ती सुधारते आणि अपचन, गॅस्ट्रिक समस्या यांसारख्या विकारांवर गुणकारी ठरते.

हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम:

यातील ॲंटिऑक्सिडन्ट्स आणि ॲंटि-इन्फ्लेमेटरी गुणधर्म हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी उपयुक्त आहेत. ते कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करून हृदयविकाराचा धोका कमी करतात.

महिलांना रोजगाराची संधी, वसई-विरार महानगर पालिकेचा अनोखा उपक्रम नेमका काय?

advertisement

त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर:

कढीपत्त्याचा वापर त्वचा आणि केसांसाठीही लाभदायक आहे. त्यातील ॲंटिमायक्रोबियल गुणधर्म त्वचेच्या समस्यांवर आणि केसगळतीवर परिणामकारक आहेत.

यकृताचे आरोग्य सुधारते:

कढीपत्त्याचे सेवन यकृताच्या कार्यक्षमतेला चालना देते आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते.

वजन कमी करण्यासाठी मदत:

कढीपत्त्याचे नियमित सेवन मेटाबॉलिझम वाढवते. यामुळे शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते.

advertisement

डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर:

कढीपत्त्यात असलेले अ जीवनसत्त्व डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे आणि दृष्टी वाढवण्यासाठी मदत करते. या सगळ्या गुणधर्मांमुळे कढीपत्त्याचे सेवन एक आरोग्यदायी पाऊल ठरू शकते, अशी माहिती त्यांनी दिली.

सूचना - ही माहिती आरोग्यतज्ञांशी साधलेल्या संवादावर आधारित आहे. ही माहिती सार्वजनिक आहे. कोणताही वैयक्तिक सल्ला नाही. त्यामुळे लोकल18 याबाबत कोणताही दावा करत नाही.

मराठी बातम्या/मुंबई/
रक्तातली साखरेची पातळी चुकूनही वाढणार नाही, फक्त दररोज चघळा ही हिरवी पाने, VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल