TRENDING:

गर्दीचं टेन्शन विसरा! 18 डब्यांच्या वंदे मेट्रो एसी लोकलचा मुहूर्त ठरला; 'या' वर्षापासून प्रवास करता येणार

Last Updated:

Mumbai Vande Metro Local : मुंबईकरांनो लवकरच वंदे मेट्रो लोकलमधून प्रवास करण्यासाठी तयार राहा. नेमकी हा प्रवास कधीपासून करता येणार आणि यात सुविधा काय मिळणार त्याबाबतची माहिती जाणून घ्या.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मुंबई उपनगरीय लोकांसाठी लोकलमध्ये जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनली आहे. मात्र वाढत्या लोकसंख्येमुळे लोकलवरील ताण वाढत आहे, त्यामुळे वारंवार अनेक नवे मार्ग काढत आहे.
१८ डब्यांची एसी वंदे मेट्रो अडीच वर्षांत सेवेत येण्याची शक्यता.
१८ डब्यांची एसी वंदे मेट्रो अडीच वर्षांत सेवेत येण्याची शक्यता.
advertisement

मुंबईकरांसाठी रेल्वेच गिफ्ट

मुंबईकरांचा रेल्वेवरील प्रवास हा सोपा करण्यासाठी अनेकदा रेल्वे फेऱ्यामध्ये वाढ तर कधी जास्त डब्ब्यांच्या लोकलची मागणी केली जात आहे. पण येत्या काही दिवसांत मुंबईकरांचा प्रवास आरामदायी पण होणार असून सोपा होणार आहे.

कधी पासून करता येणार प्रवास?

लोकलने दररोज ये-जाणाऱ्या प्रवाशांना आता जुन्या लोकलमधून प्रवास करण्याची गरज नाही त्यासाठी लवकरच वातानुकूलित वंदे मेट्रो लोकल धावणार आहे. अनेक महत्त्वाचे करार करुन येत्या अडीच वर्षात पहिली नमुना एसी वंदे मेट्रो लोकल मुंबई धावणार आहे.

advertisement

एसी वंदे मेट्रो लोकलमुळे रेल्वे प्रवासात मोठे बदल होण्याची शक्यता आहे शिवाय सध्या असलेल्या एसी लोकलपेक्षा अधिक क्षमतेने आणि जलग वेग तसेच आधुनिक सुविधांनी हे नवीन लोकल असेल.

सुविधा अन् कशी असेल नवीन लोकल?

1) नवीन एसी वंदे मेट्रो लोकल ही सुरुवातीस 12 डब्ब्यांची असेल मात्र वाढती प्रवासी मागणी लक्षात घेता 15 डब्यांपाठोपाठा 18 डब्ब्यांच्या एसी लोकलची बांधणीही करण्यात येईल.

advertisement

2) नव्या लोकलमध्ये प्रवाशाच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही, इमर्जन्सी टॉक बँक आणि महत्त्वाचे म्हणजे पॅसेंजर इमर्जन्सी अलार्मही असेल.

3)लोकलच्या डब्ब्यातही सीसीटीव्ही असणारच आहेत मात्र डब्याच्या बाहेरही सीसीटीव्ही बसवले जाणार आहेत.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
गुढीपाडव्यासाठी खरेदी करा आकर्षक नॅनो गुढी, किंमत फक्त 90 रुपयांपासून, पुण्यात हे आहे लोकेशन
सर्व पहा

4)प्रवाशांच्या संख्येनुसार हवा आपोआप नियंत्रित करणारी यंत्रणा बसवण्यात आली आहे.

मराठी बातम्या/मुंबई/
गर्दीचं टेन्शन विसरा! 18 डब्यांच्या वंदे मेट्रो एसी लोकलचा मुहूर्त ठरला; 'या' वर्षापासून प्रवास करता येणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल