विधानसभा निवडणुकीच्या वेळेला भाजपने बटेंगे तो कटेंगे असा प्रचार केला होता. पण मराठी माणसाला सांगतोय की, आता जर चुकाल तर संपाल... आता फुटाल तर संपून जाल. मराठीचा वसा टाकू नका, असं उद्धव ठाकरे म्हणाले अन् ठाकरेंच्या युतीचा पहिला मास्टरस्ट्रोक टाकला. तर मुंबईत मराठीच महापौर होणार, असं म्हणत राज ठाकरेंनी मोठी घोषणा केली.
advertisement
ज्याची अनेक दिवसांपासून प्रतिक्षा होती, ती युती झाली असं घोषणा करून राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाला एक नवी दिशा दिली आहे. मुंबईचा महापौर आमचाच होणार आणि मराठीच होणार, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांचा एक व्हिडीओ फिरतोय, ज्यात ते अल्ल्हाहूँ अकबर म्हणताना दिसतायेत. माझ्याकडे खूप व्हिडीओ आहेत, असं म्हणत राज ठाकरे यांनी बॉम्ब फोडला.
जागावाटप जाहीर का केलं नाही?
सध्या महाराष्ट्रात लहान मुलं पळवण्याच्या टोळ्या फिरत आहेत. त्यात आणखी दोन टोळ्या अॅड झाल्या आहेत. ते राजकीय पक्षांमधील मुलं पळवतात. जे निवडणुका लढवणार आहेत. त्या सर्व उमेदवारांना दोन्ही पक्षांकडून उमेदवारी दिली जाईल. कधी आणि कुठे उमेदवारी भरायची त्यांना सांगितलं जाईल, असं राज ठाकरे म्हणाले.
