TRENDING:

Mandovi Express : शेकडो प्रवाशांचे नियोजन कोलमडले! मांडवी एक्स्प्रेस तासाभरापासून गायब; कारण काय?

Last Updated:

Mandovi Express delayed Today : दादर रेल्वे स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी जमलेली आहे. मात्र ही गर्दी एका एक्सप्रेसच्या वेळेवर न आल्याने झालेली आहे. नेमकी ही ट्रेन कोणती आहे?

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मुंबईतून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई सीएसएमटीवरून सकाळी 7 वाजता सुटणारी मांडवी एक्सप्रेस उशिरा धावत असल्याने प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. गाडी वेळेवर सुटणे अपेक्षित होते मात्र दादर स्थानकावर शेकडो प्रवासी अजूनही गाडीची वाट पाहत उभे आहेत.
Mandovi Express three hours late at Dadar station
Mandovi Express three hours late at Dadar station
advertisement

दादर स्थानकात मांडवी एक्स्प्रेसच्या प्रवाशांची गर्दी

सकाळपासूनच प्रवाशांची गर्दी वाढली आहे. अनेक प्रवासी आपल्या कुटुंबासह प्रवासासाठी आले होते. काहींना कामावर जायचे होते, तर काहींना पुढील गाड्या पकडायच्या होत्या. मात्र मांडवी एक्सप्रेस वेळेवर न आल्याने सर्वांचे नियोजन बिघडले आहे.

प्रवाशांना रेल्वेची स्पष्ट माहिती नाही

सुमारे तीन तासांहून अधिक वेळ लोटला तरी गाडी का उशिरा आहे याबाबत रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी आणि संभ्रमाचे वातावरण आहे. अनेक प्रवासी रेल्वे अधिकाऱ्यांकडे चौकशी करत आहेत, परंतु स्पष्ट उत्तर मिळत नसल्याची तक्रार आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, सोयाबीनच्या दरात मोठी घट, कापसाला काय मिळाला भाव?
सर्व पहा

गाडी नेमकी केव्हा येणार याबाबत अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. माहितीअभावी प्रवासी चिंतेत असून लवकरात लवकर रेल्वे प्रशासनाने स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी होत आहे

मराठी बातम्या/मुंबई/
Mandovi Express : शेकडो प्रवाशांचे नियोजन कोलमडले! मांडवी एक्स्प्रेस तासाभरापासून गायब; कारण काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल