TRENDING:

MHADA Lottery 2026 : म्हाडाच्या घरांची सर्वांत मोठी लॉटरी आली, अर्ज कसा करायचा? अटी काय?

Last Updated:

म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे विविध उत्पन्न गटांतील 2640 सदनिकांच्या विक्रीसाठी बहुप्रतीक्षित सोडत अखेर जाहीर करण्यात आली आहे

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: मुंबईत हक्काच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या सर्वसामान्य मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे विविध उत्पन्न गटांतील 2640 सदनिकांच्या विक्रीसाठी बहुप्रतीक्षित सोडत अखेर जाहीर करण्यात आली आहे. म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या हस्ते 30 मार्च रोजी दुपारी 3 वाजता 'गो लाईव्ह' समारंभाद्वारे या प्रक्रियेचा शुभारंभ होणार आहे.
Agriculture News
Agriculture News
advertisement

या सोडतीत अत्यल्प गटासाठी 145, अल्प गटासाठी 858, मध्यम गटासाठी 1408  आणि उच्च उत्पन्न गटासाठी 229 सदनिका उपलब्ध आहेत.कन्नमवार नगर-विक्रोळी, पत्राचाळ सिद्धार्थ नगर-गोरेगाव, जुने मागाठाणे-बोरीवली, गोराई-बोरीवली, सुभाष नगर-चेंबुर, गांधीनगर- वांद्रे, पंतनगर-घाटकोपर, गिरगाव, वडाळा, कोपरी-पवई, माझगाव, तुंगा पवई, लोकमान्य नगर-दादर, पहाडी गोरेगाव, अँटॉप हिल-वडाळा यांसारख्या मोक्याच्या ठिकाणांवरील घरांचा यात समावेश आहे.

advertisement

अर्ज कसा आणि कुठे कराल?

प्रक्रिया: अर्ज नोंदणी पूर्णपणे ऑनलाईन असून IHLMS 2.0 या संगणकीय प्रणालीद्वारे राबवली जाईल.

ॲप:  गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवरून 'Mhada Housing Lottery System' हे मोबाईल ॲप डाऊनलोड करून अर्ज भरता येईल.

संकेतस्थळ: अर्जदार https://housing.mhada.gov.in  या अधिकृत वेबसाईटवर जाऊनही नोंदणी करू शकतात.

महत्त्वाच्या तारखा:

advertisement

अर्ज भरण्याची मुदत: 30  मार्च ते 29 एप्रिल 2026 (रात्री 11.59 पर्यंत).

अनामत रक्कम भरणा: 30 एप्रिल 2026 पर्यंत.

अंतिम यादी प्रसिद्धी: 12 मे 2026

सोडतीचा निकाल: 15 मे 2026  रोजी सकाळी जाहीर केला जाईल.

आवश्यक कागदपत्रे:

अर्जदाराकडे आधार कार्ड, पॅन कार्ड, 15 वर्षांचा महाराष्ट्रातील वास्तव्याचा दाखला (Domicile Certificate) आणि 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 या कालावधीतील उत्पन्नाचा पुरावा असणे अनिवार्य आहे. म्हाडाने स्पष्ट केले आहे की, घरांच्या वितरणासाठी कोणताही एजंट नेमलेला नाही, त्यामुळे नागरिकांनी फसवणुकीपासून सावध राहावे.

advertisement

कोणाला अर्ज करता येणार?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
उन्हाळ्यात लिंबूचे दर तापले, कांद्याला सरासरी दर, APMC मार्केटमधून नवी अपडेट
सर्व पहा

या सोडतीमध्ये समाविष्ट होण्याकरिता अत्यल्प उत्पन्न गटासाठी रुपये सहा लाखापर्यंत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादा आहे. अल्प उत्पन्न गटासाठी रुपये नऊ लाखापर्यंत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादा आहे. मध्यम उत्पन्न गटासाठी रुपये बारा लाखापर्यंत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादा आहे. उच्च उत्पन्न गटासाठी रुपये बारा लाखांहून अधिक वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणार्यांउचा समावेश असणार असून या गटासाठी कमाल मर्यादा ठेवण्यात आलेली नाही. अत्यल्प उत्पन्न गटातील व्यक्ती अत्यल्प व अल्प उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात. अल्प उत्पन्न गटातील व्यक्ती अल्प व मध्यम उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात. मध्यम उत्पन्न गटातील व्यक्ती मध्यम व उच्च उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात. उच्च उत्पन्न गटातील व्यक्ती केवळ उच्च उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
MHADA Lottery 2026 : म्हाडाच्या घरांची सर्वांत मोठी लॉटरी आली, अर्ज कसा करायचा? अटी काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल