TRENDING:

Municipal Election : अर्ज दाखल करून ऑफिस बाहेर आले अन् गरगरायला लागलं,2 तासात उमेदवाराचा मृत्यू

Last Updated:

मिरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीसाठी एका उमेदवाराने अर्ज भरला होता. हा अर्ज भरल्यानंतर उमेदवार बाहेर पडताच त्याची तब्यते बिघडली होती.त्यामुळे रुग्णालयात दाखल करताच त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Mira Bhyander Municipal Election
Mira Bhyander Municipal Election
advertisement

Mira Bhyander Municipal Election 2026 : दिपाली मिश्रा, प्रतिनिधी, मिरा भाईंदर : मिरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीत अर्ज भरण्याची मुदत संपली आहे. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक जिल्ह्यात नाराज उमेदवारांनी आंदोलन केल्याचा किंवा आत्मदहनाचा प्रयत्न केल्याच्या घटना घडल्या होत्या. या सर्वात मिरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीसाठी एका उमेदवाराने अर्ज भरला होता. हा अर्ज भरल्यानंतर उमेदवार बाहेर पडताच त्याची तब्यते बिघडली होती.त्यामुळे रुग्णालयात दाखल करताच त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. जावेद पठाण असे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचे नाव आहे. पठाण यांच्या या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे.

advertisement

खरं तर जावेद पठाण यांना प्रभाग क्रमांक 22 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी मिळाली होती. त्यामुळे आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी जावेद पठाण अर्ज भरायला गेले होते. जावेद पठाण यांनी अर्ज भरला आणि ते कार्यालयातून बाहेर पडले. अर्ज सादर करून बाहेर आल्यानंतर त्यांची प्रकृती अचानक बिघडली. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले होते. त्यामुळे जावेद पठाण यांच्या निधनाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात हळहळ व्यक्त होत आहे. 

advertisement

भाजप महिला पदाधिकाऱ्याला पॅनिक अटॅक

मिरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत मुलीच्या उमेदवारीची मागणी करणाऱ्या भाजपच्या माजी महिला जिल्हाध्यक्ष वनिता बने यांची उमेदवारी नाकारण्यात आल्याने त्यांना अस्वस्थतेचा झटका आल्याची घटना समोर आली आहे. त्यांच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.

advertisement

मिरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीसाठी उद्या 15 जानेवारी 2026 रोजी मतदान पार पडणार आहे. तर या निवडणुकीचा निकाल हा 16 जानेवारी 2026 ला लागणार आहे. मिरा-भाईंदर महापालिकेने निवडणूक पारदर्शक, शांततापूर्णसुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक सर्व तयारी पूर्ण केल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.निवडणुकीसाठी तयारी सुरू असलेल्या सहा महानगरपालिकांमध्ये मिरा-भाईंदर महापालिकेची तयारी अव्वल क्रमांकावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. निवडणूक यंत्रणा, मनुष्यबळ, सुरक्षा व्यवस्था तसेच मतदान केंद्रांची आखणी वेळेत पूर्ण करण्यात आली आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
महिलांनी दारू पिणं चांगलं की वाईट? पुरुषाच्या तुलनेत शरिरावर कसा होतो परिणाम?
सर्व पहा

मराठी बातम्या/मुंबई/
Municipal Election : अर्ज दाखल करून ऑफिस बाहेर आले अन् गरगरायला लागलं,2 तासात उमेदवाराचा मृत्यू
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल