TRENDING:

मुलुंड अपघात प्रकरणात धक्कादायक खुलासा, चुकीच्या वेल्डिंग कटने घडली दुर्घटना; आरोपीने सगळं सांगितलं

Last Updated:

मुलुंड अपघात प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची कसून चौकशी सुरू आहे. या चौकशीत वेल्डरकडून झालेल्या चुकीची माहिती आरोपींनी दिली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
संकेत वरक, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

मुंबई :  मुलुंड मेट्रोचा स्लॅब पडून झालेल्या अपघात प्रकरणात आता कारवाईला जोर आला असून आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच मिलन रोड बिल्डटेक या रिलायन्स अस्तालदी कंपनीच्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात प्रोजेक्ट डायरेक्टर हरीश चौहान, प्रोजेक्ट मॅनेजर कुलदीप सपकाळ, डेप्ट्युटी मॅनेजर सौरभ सिंह, सुपरवायर प्रशांत भोईर आणि अवधूत इनामदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या अपघातासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. वेल्डिंग लेबरने चुकीची वेल्डिंग कट केली त्यामुळे अपघात झाल्याची अशी माहिती आरोपीने दिली आहे,

advertisement

वडाळा-कासारवडवली दरम्यान मेट्रो मार्गिका-4 च्या सुरक्षा कठड्याचा भाग कोसळल्यामुळे तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत तर एकाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी मुलुंड पोलिसांनी कंत्राटदाराविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला असून, MMRDA ने पाच कोटींचा दंड ठोठावला आहे. तसेच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकारी अभियंता सत्यजित साळवे यांना तात्काळ निलंबित करण्याचे निर्देश दिले आहेत. शिवाय पाच जणांना अटक करण्यात आली आहे. सध्या अटक करण्यात आलेल्या आरोपींची कसून चौकशी सुरू आहे. या चौकशीत वेल्डरकडून झालेल्या चुकीची माहिती आरोपींनी दिली आहे.

advertisement

नेमकं काय समोर आलं?

समोर आलेल्या माहितीनुसार, वेल्डिंग लेबरने चुकीची वेल्डिंग कट केली त्यामुळे अपघात झाल्याची माहिती आरोपींनी दिली आहे. देखरेख करणारा कन्सल्टन्सीचा अधिकारी साई सुरेश हा देखील घटनास्थळी उपस्थित होता. लेबर राम आशिष आणि कन्सल्टन्सी अधिकारी साई सुरेश हे दोघेही फरार आहे. दोन्ही आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांनी कोर्टात दिली. सध्या पोलिसांकडून दोन्ही आरोपींचा शोध सुरू आहे.

advertisement

MMRDA चे अधिकारी काय म्हणाले?

ही घटना अत्यंत वेदनादायी आहे. बाधित कुटुंबीय आणि जखमी नागरिकांसोबत एमएमआरडीए ठामपणे उभे आहे. शासन नियम आणि करारातील तरतुदीनुसार सर्व ग्राह्य आर्थिक सहाय्य तातडीने देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. प्रत्येक पात्र रक्कम संस्थात्मक जबाबदारी आणि पूर्ण पारदर्शकतेसह त्वरित देण्यासाठी एमएमआरडीए कटिबद्ध आहे .

नेमकं काय घडलं?

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आल्याच्या दरात मोठी उलथापालथ, डाळींब आणि केळीला काय मिळाला आज भाव? Video
सर्व पहा

मुलुंड येथे मुंबई मेट्रोचे बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी सिमेंटच्या पिलरचा भाग कोसळला. शनिवार १४ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.१५ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. मुलुंड पश्चिम भागातील लाल बहादूर शास्त्री रोडवर जॉनसन अँड जॉनसन कंपनीच्या जवळ मुंबई मेट्रोचे बांधकाम सुरु असताना हा प्रकार घडला.

मराठी बातम्या/मुंबई/
मुलुंड अपघात प्रकरणात धक्कादायक खुलासा, चुकीच्या वेल्डिंग कटने घडली दुर्घटना; आरोपीने सगळं सांगितलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल