आखाती देशांचे हवाई क्षेत्र बंद
अमेरिका आणि इस्राईलने इराणवर संयुक्त लष्करी कारवाई केल्यानंतर सुरक्षिततेच्या कारणास्तव अनेक आखाती देशांनी आपले हवाई क्षेत्र (Airspace) तात्पुरते बंद केले आहे. परिणामी, युरोप आणि अमेरिकेकडे जाणारी विमाने लांबणीवर पडली आहेत किंवा रद्द करण्यात आली आहेत.
कोणत्या सेवांवर झाला परिणाम?
एअर इंडिया: मुंबईहून लंडन, न्यूयॉर्क, शिकागो, टोरंटो, फ्रँकफर्ट आणि पॅरिसला जाणारी रविवार आणि सोमवारची सर्व उड्डाणे रद्द झाली आहेत. दिल्लीहून तेल अवीवला जाणारे विमानही सुरक्षिततेसाठी अर्ध्यातून पुन्हा मुंबईला वळवण्यात आले.
advertisement
इंडिगो: इंडिगोनेही पश्चिम आशियातील आपली उड्डाणे रद्द केली असून मुंबई-लंडन सेवा विस्कळीत झाली आहे.
प्रवाशांचा मनस्ताप आणि कंपन्यांचे आश्वासन
विमान वाहतूक अचानक कोलमडल्याने प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे. अनेक विमान कंपन्या प्रवाशांना तिकिटाचा परतावा किंवा पर्यायी मार्गांचे आश्वासन देत आहेत. मात्र, हा युद्धजन्य संघर्ष अधिक लांबल्यास आंतरराष्ट्रीय विमान तिकीट दरात मोठी वाढ होण्याची आणि हवाई वाहतूक दीर्घकाळ विस्कळीत राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
