बेस्ट बसने अनेक मुंबईकरांना चिरडलं
भांडुपमध्ये झालेल्या या अपघातात मृत्यू पावलेल्यामध्ये दोन परिचारिकांचा समावेश आहे. ज्यात एकीची (वर्षा सावंत,वय 25) हीची नवीन कामाची सुरुवात होणार होती मात्र त्यापूर्वीच काळाने घाला घातला तर दुसऱ्या परिचारिका (मानसी गुरव,वय 49) यांनी 20 वर्ष रुग्णांची सेवा केली होती. या दोघींच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबीयांचा, पालकांचा आणि शेकडो रुग्णांचा आधार हरपला आहे.
advertisement
काय घडलं त्या रात्री भांडूपमध्ये?
मिळालेल्या माहितीनुसार,मानसी या लोकमान्य टिळक रुग्णालयाच गेल्या 20 वर्षापासून परिचारिका म्हणून सेवा देत होत्या तर घटनेच्या दिवशी त्या ड्युटी संपवून घरी परतत होत्या. मात्र, बसने दिलेल्या धडकेमध्ये त्यांचा मृत्यू झाला तर वर्षाही लो.टिळक पालिका रुग्णालयात परिचारिका होती. पण काकाच्या मुलीच्या लग्नावरुन परतत असताना तिचा ही या बस अपघातात दुर्देवी मृत्यू झाला.
अपघाताचे धक्कादायक कारण समोर
भांडूप रेल्वे स्थानकाजवळ बेस्ट बसचा भीषण अपघात झाला,यात चार जण ठार झाले आणि नऊ जण जखमी झाले आहेत. हा अपघात सोमवारी रात्री 9.30 च्या सुमारास घडला. 606 क्रमांकाची बेस्ट बस यू-टर्न घेत असताना अचानक प्रवाशांच्या रांगेत शिरली. त्यावेळी 13 प्रवासी बसखाली येऊन गंभीर जखमी झाले. प्राथमिक माहिती नुसार बस चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला.
