नोकरदारांना केव्हा डबा मिळणार नाही?
नोकरदारांना रोज वेळेवर डब्बा पुरवणाऱ्या 'मुंबईचे डबेवाले' यांची 30 मार्च ते 4 एप्रिल या दिवसांत डबे वितरणाची सेवा पूर्णपणे बंद असेल. दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा ग्रामदेवतेच्या जत्रेनिमित्त सुट्टी घेत असल्याचं 'मुंबई डबेवाला असोसिएशन'ने जाहीर केलं आहे. सोमवार ते शनिवार (30 मार्च ते 4 एप्रिल) हे सहा दिवस नोकरदारांना जेवणाच्या डब्यांची सेवा मिळणार नाही. त्यामुळे मुंबई आणि उपनगरांमधील लाखो नोकरदारांना पर्यायी जेवणाची व्यवस्था करावी लागणार आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा अनेक मुंबईचे डबेवाले ग्रामदेवतेच्या जत्रेसाठी गावी सहभागी होणार आहेत.
advertisement
डबेवाल्यांची ग्राहकांना विनंती...
डब्याची सेवा बंद असली तरी ग्राहकांनी डबेवाल्यांचा पगार कापू नये, अशी विनंती असोसिएशनने केलीये. गावाकडील जत्रेचे दिवस वगळता, डबेवाल्यांकडून ग्राहकांना सेवा वर्षभर पुरवली जाते. त्यामुळे या दिवसांमध्ये डबेवाल्यांना सुट्टीसाठी सहकार्य करण्याचं आवाहन असोसिएशनकडून करण्यात आले आहे. डब्यांची सेवा पुरवणारे डबेवाले बहुतांश महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ग्रामीण भागातील आहेत. गेल्या अनेक वर्षभरापासून डबेवाले गावी होणारी जत्रा, कुलदेवतेची पूजा आणि शेतीच्या कामांसाठी दरवर्षी सुट्टी घेतात. नोकरदारांनी पर्यायी व्यवस्था म्हणून, बाहेरून जेवण किंवा घरून जेवणाचा डबा घेऊन यावा लागणार आहे. अचानक अडचण येऊ नये म्हणून 'मुंबईचा डबेवाला' यांनी ग्राहकांना आधीच नियोजन करण्याचा सल्ला दिला आहे.
