मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री उशिरा ही घटना घडली. नेव्हीच्या गणवेशात आलेल्या एका संशयिताने ड्युटीवर असलेल्या अग्निवीर जवानाला सांगितले की त्याची शिफ्ट संपली आहे आणि त्याने रायफल आणि जिवंत काडतुसं त्याच्याकडून घेतली. नंतर लक्षात आले की ही व्यक्ती नौदलाची नाही, तर एक अनोळखी माणूस आहे.
या अज्ञात व्यक्तीकडे 40 जिवंत काडतूसं असल्याची माहिती मिळाली आहे. मुंबई पोलीस, नौदलाचे अधिकारी मिळून अज्ञात व्यक्तींचा शोध घेत आहेत. त्यासाठी एक वेगळं पथक तयार करण्यात आलं आहे. या अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांकडून देखील मोलाची साथ मिळत आहे.
advertisement
या घटनेची माहिती मिळताच तातडीने तपास सुरू करण्यात आला. या घटनेनंतर नेवी नगर परिसरात सर्च ऑपरेशन राबवलं जात आहे. अद्यापपर्यंत त्या संशयित व्यक्तीचा कोणताही सुगावा लागलेला नाही. तसेच, चोरीला गेलेली रायफल आणि जिवंत काडतुसेही सापडलेली नाहीत. या प्रकरणाच्या तपासात केंद्रीय तपास यंत्रणाही सहभागी झाल्या आहेत. या घटनेमुळे मुंबईच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.