एअरपोर्ट टू एअरपोर्ट प्रवास झटपट
मुंबई आणि त्या सोबत उपनगरातील दररोज नागरिक लाखोच्या संख्येने प्रवास करत असतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूकीची समस्या निर्माण होत असते. त्यामुळे या शहरात लोकल ट्रेन त्यानंतर मेट्रो सुरु करण्यात आली आहे.मेट्रोचे मुंबई शहरात अनेक मार्गिका तयार झालेल्या आहेत, त्यात सध्या तयार होणारी मेट्रो 8 ही लाईन मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबी आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणार आहे. सध्या या मेट्रो मार्गिकेचे काम सुरु असून यासाठी राज्य सरकारने 23,000 रुपये कोटींच्या प्रकल्पाच्या ब्लूप्रिंटला मंजुरी दिलेली आहे.
advertisement
ही मार्गिका तयार झाल्यानंतर मुंबई आणि त्याच्या उपनगरातील कनेक्टिव्हिटीला एक नवी दिशा नक्की मिळणार आहे. नवी मुंबई विमानळावर डिसेंबरमध्ये उड्डाणाला सुरुवात होणार असून सध्या या ठिकाणी नागरिकांसाठी वाहतूक सुविधा नाहीत, त्यामुळे भविष्यात तयार होणाऱ्या या मेट्रो प्रोजेक्टचा नागरिकांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. ज्यामुळे या दोन विमानतळामधील अंतर फक्त 30 मिनिटांत पूर्ण होणार आहे. जी की सध्या या प्रवासासाठी साधारण 2 तास लागतात.
मुंबई ते नवी मुंबईदरम्यान प्रस्तावित या मेट्रो प्रकल्पात साधारण 20 स्थानकांचा समावेश असल्याटा अंदाज आहे तसेच हा कॉरिडॉर दोन्ही शहरांतील प्रमुख विमानतळांना जोडणार असून त्यामुळे आर्थिक आणि व्यावसायिक संपर्क आणखी मजबूत होणार आहे. यामुळे मुंबईत कामासाठी येणाऱ्या प्रवाशांना लोकलबरोबरच अतिरिक्त प्रवासाचा पर्याय उपलब्ध होईल. नवी मुंबईच्या पुढील विकासाचा हा मेट्रो मार्ग एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
