advertisement

जोरदार ओरडत दगडं मारत होती महिला, पोलिसांनीही केलं आवाहन, छ. संभाजीनगरमध्ये नेमकं काय घडलं?

Last Updated:

शिवाजीनगर-गारखेडा परिसरात आढळून आलेल्या एका मनोरुग्ण महिलेला उपचार व पुनर्वसनासाठी माणुसकी वृद्ध सेवालयात दाखल करण्यात आले आहे.

+
‎जवाहरनगर

‎जवाहरनगर परिसरात आढळलेल्या मनोरुग्ण महिलेला माणुसकी वृद्ध सेवालयात दाखल

‎ छत्रपती संभाजीनगर : जवाहरनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शिवाजीनगर-गारखेडा परिसरात आढळून आलेल्या एका मनोरुग्ण महिलेला उपचार व पुनर्वसनासाठी माणुसकी वृद्ध सेवालयात दाखल करण्यात आले आहे. 23 जानेवारी 2016 रोजी सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास, सदर महिला शिवाजीनगर, गारखेडा परिसरात मिळून आली. घटनास्थळी पाहणी केली असता ती महिला मानसिक अस्थिर अवस्थेत असल्याचे दिसून आले. तिला तात्काळ ताब्यात घेऊन जवाहर नगर पोलीस ठाण्यात येथे आणण्यात आले.
‎महिला पोलिस अंमलदारामार्फत तिची चौकशी करण्यात आली असता ती विस्कळीत उत्तरे देत होती. तिच्या राहत्या घराचा पत्ता किंवा नातेवाईकांबाबत विचारणा केली असता तिने कोणतीही खात्रीशीर माहिती दिली नाही. तसेच ती कधी कधी आक्रमक वर्तन करत दगडे मारत असल्याचेही निदर्शनास आले. परवीन लड्डू शेख, वय अंदाजे 35 वर्ष, रा. सावंगी, हर्सुल, छत्रपती संभाजीनगर असे असल्याचे सांगितले असून सदर महिला ही भोळसर स्वभावाची असून उडवाउडवीची उत्तरे देत आहे. तसेच तिने तिच्या नातेवाईकांबद्दल कुठलीही माहिती दिली नाही.
advertisement
त्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सदर महिलेला पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणीत तिला मानसिक आजार असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले असून तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. महिलेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तसेच पुढील पुनर्वसनासाठी तिला माणुसकी वृद्ध सेवालय, गावंदरी तांडा येथे तात्पुरत्या निवाऱ्यासाठी दाखल करण्यात आले आहे. पुढील काळात तिच्या नातेवाईकांचा शोध सुरू ठेवण्यात येणार असल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले.
view comments
मराठी बातम्या/छ. संभाजीनगर/
जोरदार ओरडत दगडं मारत होती महिला, पोलिसांनीही केलं आवाहन, छ. संभाजीनगरमध्ये नेमकं काय घडलं?
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On Raj Thackeray : राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजकीय...''
राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजक
  • राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकतेचे संकेत दिल्यानंतर मुंबईसह राज्यात एकच राजकीय चर्

  • राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली

  • शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

View All
advertisement