TRENDING:

Mumbai-Pune Missing Link : महाराष्ट्र दिनी मुंबई-पुणे मिसिंग लिंक वाहतूकीसाठी खुला; पण 'या' वाहनांवर असणार बंदी

Last Updated:

Mumbai-Pune Missing Link Update : मुंबई-पुणे मिसिंग लिंक वाहतूकासाठी लवकरच सुरु करण्यात येणार आहे. मात्र काही वाहनचालकांना यावरुन वाहन घेऊन जाता नाही येणार.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची प्रतिक्षा आता संपणार आहे. कारण पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक सुरु होण्याची तारीख ठरली आहे, यामुळे प्रवास सुसाट होणार आहे. मात्र या मार्गावरुन जाणाऱ्या काही वाहनचालकांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे, कारण काही वाहनांना या मार्गावर प्रवेश कायमसाठी बंद करण्यात आलेला आहे.
Pune Mumbai Expressway Missing Link opening date May 1
Pune Mumbai Expressway Missing Link opening date May 1
advertisement

उद्घाटनाची तारीख फिक्स

एमएसआरडीसी यांच्या माध्यमातून पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. हा नवीन बोगदा 1 मेपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. त्यामुळे घाटातील वाहतूक कोंडी कमी होईल आणि प्रवासाचा वेळ सुमारे 20 ते 25 मिनिटांनी कमी होणार.

'या' वाहनांना असणार बंदी

मात्र प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत बोगद्यातून ज्वलनशील इंधन, अतिज्वलनशील पदार्थ आणि धोकादायक रसायनांची वाहतूक करणाऱ्या टँकरना प्रवेश दिला जाणार नाही. आंतरराष्ट्रीय एडीआर सुरक्षा नियमांनुसार या बोगद्याला 'ई' वर्गवारी देण्यात आली आहे. त्यामुळे अशा वाहनांना पर्यायी मार्गानेच जावे लागेल. याबाबत लवकरच वाहतूक आणि महामार्ग पोलिसांना अधिकृत सूचना दिल्या जाणार आहेत.

advertisement

दररोज सुमारे दोन हजार इंधन टँकर या मार्गावरून प्रवास करतात. नवीन नियमामुळे सामान्य प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुखकर होणार आहे.

हायटेक सुरक्षा व्यवस्थेसह सज्ज बोगदा

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पारंपरिक पिकाला दिला फाटा, चिया सीड्स शेतीचा यशस्वी प्रयोग, उत्पन्न लाखात
सर्व पहा

हा बोगदा 10 किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचा आहे. बोगद्याच्या प्रवेशद्वारावर अत्याधुनिक आयटीएमएस आणि एनपीआर कॅमेरे बसवले जाणार आहेत. नियम मोडणाऱ्या वाहनांची माहिती त्वरित नियंत्रण कक्षाला मिळेल तसेच इंधन गळती टाळण्यासाठी विशेष सांडपाणी व्यवस्था आणि अग्निरोधक काँक्रीटची सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीतही सुरक्षितता सुनिश्चित होणार आहे.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai-Pune Missing Link : महाराष्ट्र दिनी मुंबई-पुणे मिसिंग लिंक वाहतूकीसाठी खुला; पण 'या' वाहनांवर असणार बंदी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल