मेगाब्लॉकच्या काळात, पश्चिम रेल्वेवर सांताक्रूझ आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान पाच तासांचा जम्बो ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. तर मध्य रेल्वेवर, माटुंगा ते मुलुंड मार्गावर, हार्बर मार्गावर वाशी- पनवेल आणि ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे- वाशी मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे.
दसरा-दिवाळी गोड होणार! रेल्वेकडून प्रवाशांना मोठं गिफ्ट, काय ते वाचा
ओव्हरहेड इक्विपमेंट आणि अभियांत्रिकी कामांसाठी मध्य रेल्वेवरील कर्जत- खोपोलीदरम्यान 6 ते 9 सप्टेंबर या कालावधीत वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत कर्जत- खोपोली दरम्यानची लोकल सेवा बंद असेल. तर मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. माटुंगा ते मुलुंड मार्गावरील अप आणि डाऊन जलद मार्गावरील सर्व लोकल धीम्या मार्गावर चालवले जाणार आहेत. हा मेगाब्लॉक सकाळी 11:05 ते दुपारी 03:45 पर्यंत असणार आहे. तर पश्चिम रेल्वेवर गोरेगाव ते सांताक्रूझ या मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे.
advertisement
फक्त 35 रुपयांत अस्सल घरगुती जेवण, नाशिकमध्ये इथं असते खवय्यांची मोठी गर्दी
ब्लॉक दरम्यान, सर्व जलद मार्गावरील लोकल गोरेगाव ते सांताक्रूझ दरम्यान धीम्या मार्गावर वळवल्या जाणार आहेत. यामुळे प्रवाशांचा प्रवासाच्या वेळेमध्ये आणखीन वेळ होऊ शकतो. याव्यतिरिक्त, अनेक लोकलही रद्द केल्या जाण्याची शक्यता आहे किंवा कमी वेळा थांबविल्या जातील, ज्यामुळे दुपारच्या वेळी गर्दी आणि गैरसोय होण्याची शक्यता आहे. हा ब्लॉक रविवारी सकाळी 10:00 ते दुपारी 03:00 वाजेपर्यंत, जलद अप आणि डाउन दोन्ही मार्गांवर असेल. जम्बो ब्लॉकमध्ये रेल्वे ट्रॅक, ओव्हरहेड इक्विपमेंट (OHE) आणि सिग्नलिंग देखभालीची कामे करण्यात येणार आहेत. रेल्वेचे जाळे सुरळीत आणि सुरक्षित कामकाज सुनिश्चित करण्यासाठी ही कामे महत्त्वाची आहेत, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
नोकरी सोडली, अपयश आलं जिद्द मात्र सोडली नाही, पाणीपुरी विक्रीतून तरुण कमावतोय 100000 रुपये
हार्बर मार्गाविषयी बोलायचे झाले तर, वाशी आणि पनवेल मार्गावर अप आणि डाऊन दोन्हीही बाजूंनी मेगाब्लॉक असणार आहे. सकाळी 11:05 ते दुपारी 04:05 पर्यंत हा मेगाब्लॉक असणार आहे. तर ट्रान्सहार्बर मार्गावर ठाणे- वाशी मार्गावरील रेल्वे सुरू राहणार आहे. कुर्लावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ठाणेवरून प्रवास करता येऊ शकतो. शिवाय, उरण महामार्गावर मेगाब्लॉक नसणार आहे.