TRENDING:

Ganesh Visarjan 2025: बळीराजाला अनोखी मानवंदना, विसर्जन मिरवणुकीत कृषी साहित्यापासून साकारला बाप्पा, VIDEO

Last Updated:

Ganesh Visarjan 2025: पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीत नेहमीच कलात्मकता आणि सामाजिक संदेशाचा संगम दिसतो.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक जगप्रसिद्ध आहे. या मिरवणुकीत नेहमीच कलात्मकता आणि सामाजिक संदेशाचा संगम दिसतो. नारायण पेठेमधील 'संयुक्त प्रसाद मित्र मंडळाने' यंदा या परंपरेला साजेशी अशी संकल्पना उभी केली. या मंडळाने विसर्जन मिरवणुकीत 'कृषी गणेश'चा देखावा आणला होता. आपल्या कृतीतून त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांना वंदन केलं.
advertisement

शेतीकामाशी संबंधित साहित्याचा वापर करून या देखाव्याची मांडणी करण्यात आली. बैलगाडी, ट्रॅक्टर, विळा, खुरपे, फवारणी यंत्र, बुजगावणे अशा विविध कृषी साहित्यांच्या साहाय्याने गणरायाची प्रतिमा उभारण्यात आली. केवळ मूर्तीच नव्हे, तर संपूर्ण देखावा शेतीच्या साधनसामग्रीवर आधारित असल्याने अनेकांच्या नजरा या देखाव्याकडे वळत आहेत.

Ganesh Visarjan 2025: दिव्यांग विद्यार्थ्यांनी विसर्जन मिरवणुकीत भरले रंग, सर्वजण पाहतच राहिले VIDEO

advertisement

या उपक्रमातून मंडळाने बळीराजाला वंदन केलं आहे. शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा, अन्नाची नासाडी थांबावी आणि कृषीव्यवसायाला सन्मान मिळावा, यासाठी ही संकल्पना राबवण्यात आली आहे. मंडळाचे पदाधिकारी म्हणाले की, गणेशोत्सव हा केवळ उत्सव नसून समाजप्रबोधनाचं माध्यम आहे. मागील 30 वर्षांपासून मंडळ वेगवेगळ्या साहित्यापासून गणेश मूर्ती साकारत आहे. यावर्षी कृषी अवजारांपासून बाप्पाची प्रतिकृती साकारून शेतकऱ्यांच्या संघर्षाला सलाम केला आहे.

advertisement

'संयुक्त प्रसाद मित्र मंडळा'ची मिरवणूक नेहमीच पर्यावरणपूरकतेवर भर देणारी असते. डीजे आणि गुलाल यांचा वापर ते करत नाहीत. पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढली जाते. लाखो रुपयांचा खर्च टाळून साधेपणातही उत्सव साजरा करता येतो, हा संदेश मंडळ दरवर्षी देते. गेल्या तीन दशकांपासून या मंडळाने कलात्मकतेसोबत सामाजिक जाणिव ठेवत विविध प्रयोग केले आहेत.

advertisement

विशेष म्हणजे, लक्ष्मी रोडवरून मिरवणुकीचा मान मिळालेला असतानाही हे मंडळ केळकर रोडवरून मिरवणूक काढते. गर्दी कमी व्हावी आणि शिस्तबद्ध पद्धतीने विसर्जन व्हावे, यासाठी मंडळ प्रयत्नशील असल्याचं पदाधिकाऱ्यांनी सांगितले. मंडळाच्या मिरवणुकीत महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात असतो. पारंपरिक वाद्यांच्या गजरात, डीजेमुक्त आणि गुलालविरहित वातावरणात महिलांचा उत्स्फूर्त सहभाग उत्सव अधिकच आकर्षक बनवतो.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ganesh Visarjan 2025: बळीराजाला अनोखी मानवंदना, विसर्जन मिरवणुकीत कृषी साहित्यापासून साकारला बाप्पा, VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल