Ganesh Visarjan 2025: दिव्यांग विद्यार्थ्यांनी विसर्जन मिरवणुकीत भरले रंग, सर्वजण पाहतच राहिले VIDEO

Last Updated:

Ganesh Visarjan 2025: पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीत प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने बाप्पाची सेवा करत असतो. 

+
Ganesh

Ganesh Visarjan 2025: दिव्यांग विद्यार्थ्यांनी विसर्जन मिरवणुकीत भरले रंग, सर्वजण पाहतच राहिले VIDEO

पुणे : सांस्कृतिक नगरी असलेल्या पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक सोहळ्याला यंदा एका वेगळ्याच उपक्रमाची जोड मिळाली. पुण्यातील प्रौढ दिव्यांगांसाठी कार्यरत असलेल्या 'सेवासदन दिलासा' कार्यशाळेच्या विद्यार्थ्यांनी लक्ष्मी रोडवर बाप्पाच्या चरणी रांगोळी सेवा अर्पण केली. या रांगोळीने रस्त्यावर येणाऱ्या गणेशभक्तांचं लक्ष तर वेधलंच शिवाय, दिव्यांग व्यक्तींच्या कलेचा आणि आत्मविश्वासाचा एक सुंदर नमुना देखील सादर केला.
कार्यशाळेतील विद्यार्थ्यांनी सांगितलं की, गेल्या दोन वर्षांपासून ते विसर्जनाच्या मिरवणुकीच्या दिवशी रांगोळी काढतात. त्यांना ही, बाप्पाच्या चरणी आपली सेवा अर्पण करण्याची एक संधी वाटते. त्यामुळे मनाला खूप आनंद होतो. टीमवर्कच्या माध्यमातून तयार झालेली ही रांगोळी विद्यार्थ्यांसाठी अभिमानाचा क्षण ठरली.
advertisement
'सेवासदन दिलासा' कार्यशाळा गेल्या 40 वर्षांपासून प्रौढ दिव्यांगांसाठी काम करत आहे. कार्यशाळेत विविध व्यावसायिक उपक्रम राबवले जातात. त्यामुळे दिव्यांगांना शारीरिक आणि मानसिक जडणघडणीसाठी बळकटी मिळते. मागील दोन वर्षांपासून रांगोळी काढण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला आणि एकाग्रतेला वाव देणे हा त्यामागचा उद्देश आहे.
कार्यशाळेच्या मुख्याध्यापिकांनी सांगितलं की, रांगोळी उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये संघभावना निर्माण झाली आहे. सात ते आठ विद्यार्थी मिळून जेव्हा रांगोळी तयार करतात, तेव्हा त्यांच्या एकत्रित प्रयत्नांना सुंदर रुप मिळते. या अनुभवातून त्यांची सर्जनशीलता तर वाढतेच शिवाय आत्मविश्वासही द्विगुणीत होतो.
advertisement
पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक लाखो भाविकांच्या गर्दीने गजबजलेली असते. ढोलताशांच्या गजरात आणि उत्साहाच्या लाटेत संपन्न होणाऱ्या या मिरवणुकीत प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने बाप्पाची सेवा करत असतो.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ganesh Visarjan 2025: दिव्यांग विद्यार्थ्यांनी विसर्जन मिरवणुकीत भरले रंग, सर्वजण पाहतच राहिले VIDEO
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement